गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल राजीनामा देणार आहेत. स्वत: आनंदीबेन पटेल यांनी फेसबुकवरुन घोषणा केली आहे.

 

पक्षाला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती करणार, असं आनंदीबेन पटेल यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

मी वयाची पंचाहत्तरी पार केली आहे. त्यामुळे मी सर्वोच्च पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. युवा नेतृत्त्वाला संधी मिळावी,  मी पक्षातच सामान्य कार्यकर्ती म्हणून कार्यरत राहीन, असं आनंदीबेन पटेल यांनी म्हटलं आहे.

 

असं असलं, तरी गुजरातमध्ये पटेल आंदोलन, दलित अत्याचार या दोन घटनांमुळे देशभरात चर्चा झाली आणि गुजरात सरकारवर टीका झाली. त्यामुळे  आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी झाल्याचं सांगण्यात येत आहे.