Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये (Gujrat) आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly Election) काँग्रेसच्या (Congress) सात नेत्यांनी भरूचमध्ये पक्षाला राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये भरूच शहर काँग्रेस अध्यक्ष विक्की सोखी, राज्य युवा महासचिव निकुल मिस्त्री, भरूच शहर उपाध्यक्ष किरण चव्हाण, कोषाध्यक्ष किरण परमार, जिल्हा युवक काँग्रेसचे नेते राधे पटेल आणि पक्षाचे कार्यकर्ते किशोर सिंह आणि राकेश गोहिल यांचा समावेश आहे. यासाठी सर्व नेत्यांनी गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांना जबाबदार धरलं आहे.


गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर जबाबदार, नेत्यांचा आरोप 


विक्की सोखी म्हणाले की, "आम्ही गेली 25 वर्ष काँग्रेससोबत आहोत आणि सर्वजण कठीण परिस्थितीत पक्षाशी जोडले गेले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या भरूचमधील काँग्रेस नेत्यांना आम्ही नावांची यादी पाठवली आहे. मात्र, जगदीश ठाकोर आणि नेत्यांनी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. कोणतीच कारवाई का नाही केली? असा प्रश्न आम्ही पुन्हा विचारला असता, ज्यांना पक्षात रहायचं आहे ते राहू शकतात आणि ज्यांना सोडायचं आहे ते जाऊ शकतात, असं उत्तर प्रदेशाध्यक्षांनी दिलं.  आम्हाला अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नव्हती म्हणून आम्ही आज पक्षाला राजीनामा दिला. राजकारणात यापुढेही राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करणार


"आम्ही कोणत्या पक्षात सामील होणार हे ठरवलेलं नाही, पण चर्चा करून नंतर निर्णय घेऊ," असं सोखी म्हणाले. भरुच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष परिमलसिंह राणा म्हणाले, "राजीनाम्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्याच्याशी संपर्क साधून त्याच्या नाराजीचं कारण शोधून त्याला पक्षात परत आणण्याचा प्रयत्न करू." 


दरम्यान, यावर्षा अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वीपासूनच गुजरातमध्ये राजकीय वातावरणात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच गुजरातमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. हे खिंडार म्हणजे, निवडणुकीपूर्वीचा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gujarat Election : निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा, 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन