Assembly Elections : आज संपूर्ण देशाचं गुजरात (Gujarat) आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) या दोन राज्याकडं लक्ष लागलं आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभेचे निकाल (Assembly Elections Results) स्पष्ट होणार आहेत. या राज्यात विधानसभेचं मैदान कोण मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला (Counting) सुरुवात होणार आहे. दरम्यान, या दोन्ही राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीला काय चित्र होतं. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या? याबाबतची माहिती पाहुयात....


2017 ला गुजरातमध्ये (Gujarat) नेमकं काय झालं होतं


2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं गुजरातमध्ये विजय संपादन केला होता. सहाव्यांदा भाजने तिथे विधानसभेची निवडणूक जिंकून सत्ता काबीज केली होती.  2017 च्या निवडणुकीत गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. तर या निवडणुकीत काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर इतर पक्षांना 6 जागांवर समाधान मानावं लागलं होते. या काळात भाजपच्या मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे तर, 2017 च्या निवडणुकीत भाजपला 49.05 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला 41.44 टक्के मते मिळाली होती.


2017 च्या तुलनेत 2022 मध्ये मतदानाच्या टक्केवारीत घट 


यावेळी 2017 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी सुमारे चार टक्क्यांनी कमी झाली. 2017 मध्ये गुजरातमध्ये मतदानाची टक्केवारी ही 68.39 टक्के होती. यावर्षी त्यामध्ये घट होऊन 64.33 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या टक्केवारीत घसरण होण्यामागे शहरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यात दाखवलेली उदासनीता आहे. 


हिमाचल प्रदेशमध्ये  (Himachal Pradesh) 2017 ला काय झालं होतं?


हिमाचल प्रदेशमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. हिमाचलमध्ये भाजपने 44 जागा जिंकल्या, होत्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. तीन जागा इतर पक्षांना मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली होती. 2012 च्या तुलनेत भाजपला 18 जागा अधिक मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 15 जागा कमी झाल्या मिळाल्या होत्या. यावेळी हिमाचलमध्ये काँग्रेसची कामगिरी सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मतदानाला जनतेचा चांगला प्रतिसाद 


हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 12 नोव्हेंबर रोजी विक्रमी 76 टक्के मतदान झाले होते. यापूर्वी 2017 च्या मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 75.57 टक्के मतदान झाले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


Election Results 2022 : गुजरात-हिमाचलमध्ये आज विधानसभेचा निकाल जाहीर होणार, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात