Google Year in Search : सध्याच्या युगाला डिजिटल युग म्हटलं जातं. या डिजिटल युगात आपल्याला हवी असलेली जगभरातील कोणतीही आणि कसलीही माहिती गुगलवर (Google) अगदी सहज उपलब्ध होते. त्यामुळे अनेकवेळा गुगल हाच गुरू असल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकले असेलच. गुगलवर जगभरातील माहितीचे भांडार उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला हवी असलेली माहिती जाणून घेण्यासाठी आपण गुगलमध्ये सर्च करतो. जगभरातील सर्च इंजिनमध्ये गुगल हे सर्च इंजिन अग्रस्थानी आहे. अगदी आपल्याला जेवणासाठी कोणते हॉटेल (Restaurant) चांगले आहे याची देखील गुगलकडून माहिती पुरविली जाते. आपण फिरण्यासाठी बाहेर पडलो तर गुगलच आपला गाईड असतो. आपल्या जवळ कोणता मॉल (Malls) आहे? एटीएम (ATM) किती अंतरावर आहे? पोहोण्यासाठी स्विमिंग पूल (Swimming pool) जवळ आहे का? यासह अशा सर्वच गोष्टी आपण गुगलवर शोधत असतो. गुगलने नुकताच आपला 'इयर इन सर्च 2022' अहवाल (google year in search 2022) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 2022 या वर्षात आपल्या जवळच्या (Near Me) कोणत्या गोष्टी सर्वात जास्त वेळा सर्च केल्या आहेत याची माहिती देण्यात आलीय.
1) कोरोना लसीकरण सेंटर ( Covid vaccine )
जवळपास गेल्या पावणे तीन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातलाय. भारतात देखील कोरोनामुळे लाखो लोकांचे प्राण गेले. अलीकडे यातून थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यातल्या त्यात 2022 हे वर्ष सुरू झाल्यानंतर जानेवारी वगळता बाकी वर्षभरात कोरोनाच्या रूग्णांमध्ये चांगलीच घट झाली आहे. तरी देखील कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण सेंटर आपल्या जवळपास कोठे आहे हे गुगलवर 2022 मध्ये सर्वात जास्त वेला सर्च करण्यात आले आहे. 2 जानेवारी 2022 ते 2 एप्रिल 2022 या काळात गुगल मॅमपवर कोरोना लसीकरण सेंटर सर्धाधिक सर्च करण्यात आले आहे.
2) जलतरण तलाव ( Swimming pool )
खेळाडूंपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जण पोहोण्यासाठी जलतरण तलावाचा वापर करतात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त प्रमाणात जलतरण तलावांचा वापर केला जातो. गुगलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2022 मध्ये मॅपवर जलतरण तलाव सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले आहे. घराबाहेर पडल्यानंतर लगेच म्हणजे हाकेच्या अंतरावर जलतरण तलाव कोठे आहे हे आपण शोधतो. 2022 मध्ये असाच सर्वाधित शोध जलतरण तलावांचा शोध घेण्यात आलाय.
3) वॉटर पार्क ( Water park )
कुटुंबासमवेत आठवड्याच्या शेवटी सुट्टी आंनदात घालविण्यासाठी अनेकवेळा सर्वोत्कृष्ट वॉटर पार्कची निवड केली जाते. उद्यानाच्या आत किंवा समुद्रकिनारी देखील वॉटर पार्क तयार करण्यात येतात. परंतु, याचा जास्त वेळा वापर केला जात नसल्याने आपल्या आजूसपास वॉटर पार्क कोठे आहे याची अनेक वेला आपल्याला माहिती नसते. अशा वेळी आपण गुगल मॅपवर आपल्या जवळच्या वॉटर पार्कचा शोध घेतला जातो. 2022 या वर्षात देखील गुगल मॅपवर वॉटर पार्कचा शोध घेण्यात आलाय. 2 जानेवारी 2022 ते 3 जुलै 2022 या कालावधीत सर्वाधिक वॉटर पार्कचा शोध घेतलाय.
4) चित्रपटगृह ( Movies )
कोरोना महामारीच्या काळात असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील चित्रपटगृह बंद होती. त्यामुले ओटीटी हा पर्याय खूप लोकांनी अवलंबला. त्यामुळे ओटीटीची सवय झालेले लोक आचा पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाणार नाहीत असे म्हटले जात होते. परंतु, गुगलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2022 मध्ये आपल्या आजूबाजूला कोणचे चित्रपटगृह आहे याचा शोध घेतलाय. 2022 या वर्षात जानेवारी म्हण्यात देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. तरी देखील याच महिन्यात गुगल मॅपवर सर्वाधिक जास्त चित्रपगृहांचा शोध घेण्यात आलाय.
5) हॉटेल (Takeout restaurants open now)
चित्रपटगृहांप्रमाणेच कोरोना काळात देशभरातील हॉटेल देखील बंद होती. त्यामुळे 2022 मध्ये कोरोनातून थोडासा दिलास मिळताच लोकांनी आपल्या आवडत्या हॉटेलमधील जेवणावर ताव मारण्यास पसंती दिली. त्यामुळे 2022 या वर्षात आपल्या शेजारील सुरू असलेली हॉटेल शोधण्यासाठी गुगल मॅपवर सर्च करण्यात आले, अशी माहिती गुगलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
6) मॉल ( Malls )
चित्रपटगृह, हॉलप्रमाणे कोरोना काळात देशभरातील मॉल देखील बंद होते. मॉलमध्ये जास्त गर्दी होते आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त पसरतो यामुळे कोरोना काळात मॉल बंद ठेवण्यात आले होते. परंतु, 2022 मध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर नियमांमध्ये शिथिलता आली आणि मॉल सुरू करण्यात आले. त्यामुळे दोन वर्षे खरेदी न करू शकणाऱ्या शौकिनांनी मॉलमध्ये गर्दी केली. त्यासाठी आपल्या जवळ कोणता मॉल आहे हे जाणून घेण्यासाठी 2022 मध्ये सर्वाधिक जास्त मॉल सर्च करण्यात आले आहेत.
7) मेट्रो स्थानक (Metro station)
देशातील खूप कमी शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाचतो आणि प्रवास देखील सुखकर होतो. दिल्ली, बंगळूरू, मुंबईसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. कामावर जाण्यासाठी शहरात जास्तीत जास्त मेट्रोचाच वापर केला जातो. गुगलने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार 2022 मध्ये गुगल मॅपवर आपल्या जवळची मेट्रो स्थानके सर्वात जास्त सर्च केली आहेत.
8) RT-PCR
कोरोना चाचणी केल्यानंतर जळपास तीन ते चार दिवसांनी त्याचा अहवाल येत असे. हा अहवाल येईपर्यंत मनात धाकधूक असे. परंतु, आटीपीसीआर केल्यानंतर कोरोना अहवाल काही वेळातच मिळत असे. 2022 मध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर देखील अनेकांनी आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. त्यामुळेच या वर्षात गुगल मॅपवर आरटीपीसीआर केंद्र कुठे आहे हे सर्वाधिक जास्त वेळा सर्च करण्यात आले आहे, अशी माहिती गुगलने जाहीर केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
9) पोलिओ बूथ ( Polio drops )
'राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2022' अंतर्गत वर्षभरात देशातील सर्वच भागात 0 ते 05 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण आयोजित करण्यात आले होते. यासाठी ठिकठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात आली होती. आपल्या पाल्याला पोलिओ लस देण्यासाठी जवळ पोलिओ बूथ कोठे आहे याचा गुगल मॅपवर शोध घेण्यात आलाय.
10) भाड्याचे घर (Rental houses )
2020 -21 या काळात कोरोना असल्यामुळे अनेक लोक शहरातून आपापल्या गावी गेले. त्यामुळे अनेक भाड्याची घरे रिकामी झाली. परंतु, 2022 मध्ये कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर पुन्हा हे लोक गावाकडून शहरात स्थलांतरीत झाले. यावेळी या लोकांना राण्यासाठी भाड्याच्या घराची आवश्यकता होती. त्यामुळे 2022 या वर्षात जवळचे भाड्याच्या भाड्याच्या घराचा शोध घेण्यात आलाय, अशी माहिती गुगलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आलीय.
महत्वाच्या बातम्या
Google Year in Search : वर्षभरात गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं गेलं? जाणून घ्या 2022 मधील टॉप सर्च