Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (18 फेब्रुवारी) नवी दिल्ली येथे जीएसटी परिषदेची 49 वी बैठक पार पडली. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक महत्वाचे निर्णय निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी घेतले. या बैठकीनंतर काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले? ते जाणून घेऊयात...


जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त? 



  • काकवी

  • पेन्सिल शार्पनर (शार्पनरवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे.)

  • ट्रॅकिंग डिव्हाइज

  • एनटीएद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेची फी


काय महाग? 
कोर्ट सर्व्हिस
पान मसाला 
गुटखा 
तंबाखू 






राज्यांना जीएसटी मिळणार


जून 2022साठी जीएसटी भरपाईची रु. 16,982 कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी राज्यांना चुकती करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. जीएसटी भरपाई निधीमध्ये कोणतीही रक्कम नसल्यामुळे केंद्राने ही रक्कम आपल्या स्वतःच्या संसाधनांमधून खुली करण्याचा आणि ती भविष्यातील भरपाई अधिभार संकलनातून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.   केंद्र सरकार ज्या राज्यांनी राज्यांच्या महालेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली महसुलाची आकडेवारी उपलब्ध केली आहे त्या राज्यांना ग्राह्य असलेली जीएसटीची अंतिम भरपाई म्हणून देखील 16,524 कोटी रुपयांची थकबाकी चुकती करणार आहे.


मनीष सिसोदिया यांनी या बैठकीत पापड आणि कचरीच्या कर आकारणीतील तफावत दूर करण्याची मागणी  केली. याबाबत त्यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत पापड आणि कचरीच्या कर आकारणीतील तफावत दूर करण्याची मागणी करण्यात आली. पापडवर 0% GST आहे पण कचरीला 18% कराच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. नमकीन, पास्ता, पिझ्झा ब्रेड, शेवया इत्यादींवर 5% ते 12% कर आहे. मग कचरीवर 18% कर ठेवणे चुकीचे आहे. ' 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Wheat Price : गव्हाच्या किमंतीत घट होणार, मार्चच्या शेवटपर्यंत 25 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री होणार