एक्स्प्लोर

GST Collection : कोरोनामुळे GST कलेक्शनमध्ये घट, जून महिन्यात 92,849 कोटींची वसुली

जीएसटी महसुल सलग आठ महीने  1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मधे तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे.

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी संकलन जून महिन्यात 92,849 कोटी रुपयांवर आले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे, 9 महिन्यांत प्रथमच इतकी म्हणजेच 1 लाख कोटींच्या खाली घसरण झाली आहे. अर्थ मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मात्र, जूनचा जीएसटी महसूल मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत दोन टक्क्यांनी अधिक आहे.

जून 2021 मध्ये 92,849 कोटी रुपयांची सकल वस्तु आणि सेवा कर-जीएसटीची महसुल वसुली झाली आहे. यात सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, एसजीएसटी 20,397 कोटी रुपये आणि आयजीएसटी 49,079 कोटी रुपये, (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या 25,762 कोटी रुपयांसह) आणि उपकर 6,949 कोटी रुपये (वस्तुंच्या आयातीवर वसूली झालेल्या 809 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. या आकडेवारीत 5 जून ते 5 जुलै 2021 दरम्यान देशांतर्गत व्यवहाराच्या माध्यमातून वसुली झालेल्या जीएसटी महसुलाचा समावेश आहे. कारण, कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मे-2021 साठी परतावा भरण्याकरता 15 दिवसांच्या विलंबासह व्याजात सूट/व्याजासंदर्भात विविध सवलती दिल्या होत्या.

या महीन्यात सरकारने नियमित तोडग्याच्या रूपात 19,286 कोटी रुपये सीजीएसटी आणि  16,939  कोटी रुपये एसजीएसटीतून आयजीएसटी असा तोडगा काढला. जून 2021 ची महसुल वसूली गेल्या वर्षीच्या या महिन्यातील महसुल वसुलीपेक्षा 2 टक्के अधिक आहे. जीएसटी महसुल सलग आठ महीने  1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मधे तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे . जून, 2021 मधला जीएसटी महसुल मे 2021 मधे  झालेल्या व्यावसायिक व्यवहाराशी संबंधित आहे. मे 2021 दरम्यान बहुतांश राज्ये / केंद्र शासित प्रदेश कोविडमुळे  पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे 2021 महीन्यातील  ई-वे बिल डेटा पाहिला असता लक्षात येते की  एप्रिल 2021 मधील 5.88 कोटींच्या तुलनेत मे महीन्यात  3.99 कोटी ई-वे बिल तयार झाले, जे 30 टक्क्यांहून कमी आहे.

कोविड रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे जून 2021 मधे 5.5 कोटी ई-वे बिल तयार केले गेले. व्यापार आणि व्यवसाय रुळावर येत असल्याचेच हे निदर्शक आहे. एप्रिल 2021च्या पहिल्या दोन आठवड्यात दिवसाला सरासरी 20 लाख ई-वे बिल तयार होत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते घटून 16 लाख आणि 9 ते 22 मे दरम्यान दोन आठवड्यात आणखी घट होऊन  12 लाख झाले. यानंतर ई-वे बिल तयार होण्याची सरासरी वाढत असून 20 जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात ती पुन्हा 20 लाखाच्या पातळीवर पोहचली  आहे. त्यामुळे जून महीन्यात जीएसटी महसुलात घट दिसून आली असली तरी  जुलै 2021 पासून  जीएसटी महसुलात पुन्हा वाढ दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Embed widget