एक्स्प्लोर
महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. विधानपरिषदेने कोणत्याही शिफारसीशिवाय विधेयक विधानसभेकडे पाठवलं. दोन्ही सभागृहात जीसएटी विधेयक एकमताने मंजूर झालं आहे. केंद्रात जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात शनिवारपासून तीन दिवसाचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी जीएसटीसंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झालं. जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. GST मुळे काय महाग, काय स्वस्त? या वस्तू/सेवांवर कर नाही (0 % टॅक्स) ताजं दूध अन्नधान्य मीठ तांदूळ, पापड, रोटी चारा/गवत कंडोम गर्भनिरोधक औषधे पुस्तके जळाऊ लाकूड बांगड्या या वस्तू/सेवांवर 5 टक्के टॅक्स चहा, कॉफी खाद्यतेल ब्रँडेड अन्नधान्य सोयाबीन, सूर्यफूल पनीर कोळसा (4000 रुपये प्रती टन लेवीसह) रॉकेल घरगुती वापराचा एलपीजी कृत्रिम किडनी हातपंत लोखंड, स्टील, लोखंड मिश्रीत धातू तांब्याची भांडी झाडू या वस्तू/सेवांवर 12 टक्के टॅक्स ड्राय फ्रूट्स/ सुका मेवा लोणी, तूप नमकीन मांस-मच्छी दूधापासून बनलेले पेय साठवलेलं मांस बायोगॅस मेणबत्ती एनेस्थेटिक्स – भूलीची औषध अगरबत्ती दंतमंजन पावडर चष्मा लेन्स मुलांची ड्रॉईंग बुक कॅलेंडर एलपीजी स्टोव्ह नट,बोल्ट, पेंच ट्रॅक्टर सायकल LED लाईट खेळाचं साहित्य आर्ट वर्क – कलाकुसरीचं साहित्य या वस्तू/सेवांवर 18 टक्के टॅक्स शुद्ध साखर कंडेंस्ड मिल्क – आटवलेलं दूध संरक्षित भाज्या केसांचं तेल साबण हेलमेट नोटबूक जॅम-जेली सॉस, सूप, आयस्क्रीम, मॅगीसारखे इंस्टंट फूड मिनरल वॉटर पेट्रोलियम जेली, पेट्रोलियम कोक टॉयलेट पेपर या वस्तू/सेवांवर 28 टक्के टॅक्स मोटर कार मोटर सायकल चॉकलेट,बटर, फॅट्स ऑईल पान मसाला फ्रिज परफ्युम, डिओड्रंट मेकअप साहित्य वॉल पुट्टी भिंतीचे रंग टूथपेस्ट शेविंग क्रीम आफ्टर शेव लिक्विड सोप/हॅण्डवॉश रबर टायर चामडी बॅग मार्बल,ग्रेनाईट, प्लास्टर, मायका टेम्पर्ड ग्लास रेजर डिश वॉशिंग मशिन पियानो संबंधित बातम्या राज्यात जीएसटीसाठी तीन दिवसांचं विशेष अधिवेशन जीएसटीमुळे दूध, अन्नधान्यावर कर नाही, एसी-फ्रीजही स्वस्त होणार जीएसटीसाठी विशेष अधिवेशन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी! राज्यात जीएसटीचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळाची मंजुरी जीएसटीचा मार्ग मोकळा, विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















