एक्स्प्लोर
पूंछमध्ये ग्रेने़ड हल्ला, काश्मीरात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न

पूंछ : जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचाच भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडसावून सांगितल्यानंतर हा हल्ला झाला आहे. पूंछच्या बस स्टँडवर झालेल्या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. पूंछमध्ये दहशतवादी संघटना आयसिस आणि पाकिस्तान जिंदाबाद अशा चिठ्ठ्या सापडल्या. मोदींच्या वक्तव्यानंतर चवताळलेल्या आयएसआयकडून काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयएसआयनं हुर्रियत कॉन्फरन्स आणि सरकारी कार्यालयांना 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान 15 ऑगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















