Income Tax Department Recruitment 2021: आयकर विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. आयकर विभागानं क्रीडा कोट्याअंतर्गत कर सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindia.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
याशिवाय, उमेदवार थेट अधिकृत लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच तुम्ही या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचनाही पाहू शकतात. याअंतर्गत एकूण 7 पदांची भरती केली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
रिक्त जागा-
कर सहाय्यक – 5 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ – 2 पदे
पात्रता-
कर सहाय्यक–
कर सहाय्यक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे. तसेच उमेदवाराचा डेटा एंट्रीचा वेग 8000 डिप्रेशन प्रति तास असणे आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ–
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयाची अट-
कर सहाय्यक – 18 ते 27 वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ- 18 ते 25 वर्षे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, भारत संचार निगम लिमिटेड येथे नोकरीची संधी
- Job Majha : BSNL, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नोकरीची संधी
- Tesla is Hiring AI Engineers : टेस्ला एआयमध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज