नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संक्रमण वाढत असताना काही राज्यांत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशावेळी गरीब लोकांच्या आर्थिक अडचणींचा प्रश्न उभा राहतो. देशातील कोरोनाच्या उद्रेकामुळे गरीब आणि गरजू लोकांना होणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जाण्यासाठी भारत सरकारने मे आणि जून या दोन महिन्यासाठी 5 किलो प्रति व्यक्ती धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा देशातील 80 कोटी लोकांना होणार आहे.  


राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या धर्तीवर हे अन्नधान्य पुढील दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात येणार आहे.


 






या विशेष योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गृहकर्मी या दोन्ही प्रवर्गांतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात येईल.  दरमहा प्रति व्यक्ती 5 किलोच्या प्रमाणात अन्नधान्य अनुदानावर आणि आंतरराज्यीय वाहतुकीसाठी राज्ये  आणि केंद्रशासित प्रदेशांना सहाय्य करण्यासाठी 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च भारत सरकार करेल.


देशातील कोविड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या हालअपेष्टा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील दोन महिने अर्थात मे आणि जून या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 अंतर्गत समावेश असणाऱ्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे


महत्वाच्या बातम्या :