एक्स्प्लोर

केंद्र सरकारकडून सूर्यफूल बियांच्या आयात शुल्कामध्ये 20 टक्के कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूर्यफूलाच्या बियांचे आयात शुल्क 30 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे साखरेच्याही आयात शुल्कामध्ये कपात करण्याची शक्यता आहे. सूर्यफूल बियांच्या आयात शुल्क कपातीसंदर्भात सरकारच्यावतीने शुक्रवारी अध्यादेश काढून ही कपातीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून तेल उत्पादक कंपन्यांकडून होणाऱ्या मागणीला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, सरकारने सूर्यफूलाच्या बियांच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांनी कपात केली आहे. याआधी सूर्यफूलांच्या बियांवर 30 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. पण आता त्यामध्ये 20 टक्क्यांनी कपात करुन 10 टक्के केली आहे. पण दुसरीकडे मोहरी आणि सोयबीनच्या आयात शुल्कामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची कपात केली नाही. सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार ही कपात 1 एप्रिलपासून लागू असणार आहे. सरकारच्या या निर्णयाचं तेल उद्योगातील कंपन्यांनीही स्वागत केलं आहे. सध्या देशात सूर्यफूलाच्या बियांचं उत्पादन कमी होतं. मात्र, सूर्यफूल तेलाचं उत्पादन आणि मागणी मोठी आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना आयात करण्याशिवाय पर्याय नसायचा. पण या निर्णयानंतर तेल आयात करण्याऐवजी बिया आयात करुन देशातंर्गत सूर्यफूलाच्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. गेल्या काही वर्षांपासून सूर्यफूल तेलाची वार्षिक आयात 15 लाख टनाहून आधिक आहे. 2015-16 या वर्षात देशात तब्बल 15.16 लाख टन सूर्यफूल तेल आयात करावं लागलं. तर 2014-15 मध्ये 15.42 लाख टन सूर्यफूल तेल आयात केलं गेलं. तर दुसरीकडे साखरेच्या आयात शुल्कामध्येही सरकार कपात करण्याची शक्यता आहे. सध्या साखरेवर 40 टक्के आयात शुल्क आकारलं जातं, यामध्येही मोठी कपात होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Twisha Sharma Death Case: लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांत मृत्यू, 13 दिवस त्विशाचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, दुसऱ्या पोस्टमॉर्टमकडे सर्वांचं लक्ष, काय धक्कादायक माहिती समोर येणार?
Sansad Ratna Awards 2026 : संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?
संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
Embed widget