एक्स्प्लोर

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कॅशलेस, कॅबिनेट बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस इंडियाच्या दिशेने मोदी सरकारची घोडदौड सुरुच आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोख रकमेऐवजी बँक खात्यात जमा होईल. कॅबिनेट बैठकीत यासंदर्भात अध्यादेशाला मंजुरी मिळाली आहे. या अध्यादेशातील तरतुदींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना रोख रकमेच्या स्वरुपात पगार मिळणार नाही. पगार हा चेकच्या माध्यमातून किंवा थेट बँक खात्यात ट्रान्सफर केला जाईल. लोकसभेत 15 डिसेंबरला 2016 रोजी यासंदर्भातील विधेयक सादर करण्यात आलं. पुढच्या वर्षी बजेट सत्रात हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. मात्र विधेयक मंजुरीसाठी आणखी दोन महिने वाट बघण्यापेक्षा सरकारने अध्यादेश आणला आहे. अध्यादेश पुढील सहा महिन्यांसाठी वैध असतो. यथावकाश विधेयकाला संसदेत मंजुरी देण्यात येईल. कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी संबंधित विधेयक लोकसभेत सादर केलं आहे. यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना चेक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून थेट बँक खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे डिजिटल आणि लेस-कॅश अर्थव्यवस्थेचं उद्दिष्टही पूर्ण होईल, असं या विधेयकात म्हटलं आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. डिजिटल पेमेंटवर सूट देण्यापासून निती आयोगाच्या 'लकी ग्राहक योजना' आणि 'डिजी धन व्यापारी योजना' यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 PM: 13 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 11 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaut vs Shinde Special Report : निवडणुकांच्या कसोटीत पैशांचा खेळ? राऊत - लंकेंचे गंभीर आरोप!Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget