नवी दिल्ली : नोटबंदीनंतर बँक खात्यात उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांवर आता टाच येण्याची शक्यता आहे. बँक खात्यात उप्तन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांना टॅक्स, टॅक्स वगळून उरलेली रक्कम 4 वर्षे वापरता येणार नाही. शिवाय, भरभक्कम दंडही ठोठावला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. संसदेच याच सत्रात याबाबत विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे.

  • बेहिशेबी मालमत्ता स्वत:हून सांगितली तर- 50 टक्के कर आणि उर्वरित रक्कम 4 वर्षे वापरता येणार नाही. सोबत भरभक्कम दंड.

  • बेहिशेबी मालमत्ता स्वत:हून सांगितली नाहीत तर- 60 टक्के कर आणि उर्वरित 4 वर्षे वापरता येणार नाही. सोबत भरभक्कम दंड.


 


कुणी कुणी घाबरायची गरज नाही :

  • गृहिणीच्या नावावर अडीच लाख असतील तर

  • शेतकरी ज्यांचं उत्पन्न शेतजमिनीच्या प्रमाणात

  • ज्यांनी आपलं इन्कम टॅक्स डिक्सलेरेशन प्रामाणिकपणे आधीच दिलेलं आहे


 

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. त्यामुळे बेहिशेबी जुन्या नोटा बँकेत जमा करणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी इन्कम टॅक्स कायद्यातही बदल करण्यात येणार असून संसदेच्या याच सत्रामध्ये याविषयीचं विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता आहे.