चंदीगढ : भारताच्या वाट्याचा सिंधू नदीच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानाला जाऊ देणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते पंजाबमधल्या बठींडात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते.


काय आहे सिंधू नदी पाणीवाटप करार?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते बठिंडामध्ये 'एम्स'चं भूमीपूजन झालं. त्यानंतर मोदींनी रॅलीला संबोधित केलं.

यावेळी मोदींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं. "शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर ते मातीतून सोनं पिकवतील.  आमच्या शेतकऱ्यांचं सिंधू नदीच्या पाण्यावर पूर्ण अधिकार आहे. भारताच्या हक्काचं जे पाणी आहे, ते पाणी पाकिस्तानला जाणार नाही", असं मोदींनी नमूद केलं.

'सर्जिकल स्ट्राईक' मुळे पाकिस्तानला मोठा धक्का

यावेळी मोदींनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दलही भाष्य केलं. भारताने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. या धक्क्यातून पाक अजून सावरला नाही, असं मोदी म्हणाले.

नोटाबंदीचा गरिबांना फायदा

नोटाबंदी निर्णयामुळे काळे धंदेवाल्याना धक्का बसला आहे. नोटांबदीचा गरिबांनाच फायदा होईल, असं मोदींनी नमूद केलं.

काय आहे सिंधू नदी पाणीवाटप करार?

*वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनंतर साठच्या दशकात हा करार झाला.

*ज्यानुसार सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलय, बियास, रावी, या पूर्व खोऱ्यात तर सिंधु, झेलम, चिनाब या पश्चिम खोऱ्यात येतात.

*यातल्या पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे.

*पश्चिम खो-यातल्या पाण्यावर मात्र काही बंधनं आहेत. पश्चिम खो-यातलं पाणी हे पाकिस्तानला जातं.

संबंधित बातम्या

मोदींच्या सिंधू नदी करारावरील भूमिकेने पाकला धडकी

पाकिस्तानमधील ‘सार्क’ परिषदेवर भारताचा बहिष्कार

खून और पानी एक साथ नही बह सकता, पंतप्रधानांची कडक भूमिका

पाकची जिरवण्यासाठी पंतप्रधान मोदी आज मोठा निर्णय घेणार?

उरी हल्ल्याचा सूड घेणारच, ‘मन की बात’मधून मोदींचा पुनरुच्चार

भारताचा जालीम उपाय, पाकला जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखणार?