Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. रमजानच्या निमित्तानं आंध्रप्रदेश सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. आंध्रप्रदेशमधील सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी जे इस्लामचा धर्म मानतात त्यांना एक तास आधी कामकाजाचं ठिकाण सोडून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 3 एप्रिल ते 2 मे या कालावधीत रमजान महिन्यातील सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये संध्याकाळी एक तास लवकर सरकारी कार्यालये, शाळा सोडण्याची परवानगी असल्याचं आंध्र प्रदेश सरकारनं पत्र काढत सांगितलं आहे.
रमजान महिन्याचे महत्त्व
रमजानचा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. उपवास करण्यासोबतच या संपूर्ण महिन्यात आपले विचारही शुद्धता ठेवावे लागतात. आपल्या शब्दांनी कोणाचेही नुकसान न होणार नाही हेही आवश्यक असते. हा महिनाभर शरीराच्या शुद्धतेसाठी विशेष काळजी घेतली जाते.
रमजान महिन्यात उपवास का केला जातो?
रमजान हा महिन्यामध्ये इस्लाम धर्माचे पवित्र प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या समक्ष पवित्र ग्रंथ कुराणचा पहिला श्लोक मुस्लिमांच्या अनावरण करण्यात आला होता. तेव्हापासून इस्लाममध्ये हा महिना पवित्र मानून महिनाभर उपवास करण्याची परंपरा सुरू झाली.
उपवास हे इस्लाम धर्माच्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. उपवास, नमाज, दान, श्रद्धा आणि मक्काची हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच तत्त्वे आहेत. मुस्लिम बांधवाच्या जीवनात या पाच तत्त्वांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या
Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा