नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता करदात्यांना कर भरण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. वेगवेगळे कर भरण्याच्या मुदतीमध्ये 15 दिवस ते तीन महिन्यांची वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली आहे. तसेच कोरोनावरील उपचारासाठी मिळणाऱ्या रक्कमेवर कोणताही कर लावण्यात येणार नाही असंही केद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, जर एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याच्या कोरोनावरील उपचारासाठी खर्च केला असेल तर त्यावर कोणताही कर लावण्यात येणार नाही. म्हणजे उपचारांसाठी मिळालेल्या मदतीवर आता कोणताही कर लागणार नाही. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मिळणाऱ्या 10 लाखांपर्यंतच्या आर्थिक मदतीवरही कोणताही कर लागणार नाही. 


 






कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता करदात्यांना कर भरण्यासाठीच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 15 दिवस ते तीन महिन्यांपर्यंत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पॅन कार्डला आधार लिंक करण्याची मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर केली आहे. तसेच 2020-21 सालच्या शेवटच्या तिमाहीतील टीडीएस स्टेटमेंटसाठीची शेवटची तारीख आता 30 जून ऐवजी 15 जुलै करण्यात आली आहे. फॉर्म नंबर 16 मध्ये टॅक्स डिडक्शन सर्टिफिकेट आता 15 जुलै ऐवजी 31 जुलैपर्यंत दाखल करता येऊ शकेल. नॉन टीडीएसही 31 जुलैपर्यंत दाखल करता येऊ शकेल. 


इन्कम टॅक्स सेटलमेंट कमिशनसंबधी पेंडिग केस विड्रॉ करण्यासाठी आता 27 जुन ऐवजी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. विश्वास योजनेअंतर्गत बिन व्याजी पेमेंट करण्याची शेवटची तारीख 30 जून वरुन 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. तर व्याजासहित पेमेंट करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे. 


 






महत्वाच्या बातम्या :