एक्स्प्लोर

Cell Broadcast System Test: तुमच्या मोबाईलवरही सायरन वाजला? घाबरू नका, ही आहे सरकारची सुरक्षा चाचणी, नेमकं विषय काय, समजून घ्या सोप्या भाषेत

Cell Broadcast System Test: भविष्यात भूकंप, वीज कोसळणे, सुनामी किंवा गॅस गळतीसारख्या आपत्तींमध्ये नागरिकांपर्यंत तात्काळ सूचना पोहोचतात का, याची पडताळणी करण्यासाठी ही चाचणी घेतली जात आहे.

नवी दिल्ली: देशातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर इशारा देण्यासाठी केंद्र सरकारकडून सेल ब्रॉडकास्ट सिस्टमची चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीदरम्यान तुमच्या मोबाईलवर अचानक मोठ्या आवाजात अलर्ट (Cell Broadcast System Test) वाजू शकतो. मात्र, हा कोणताही धोका नसून फक्त टेस्टिंगसाठी (Cell Broadcast System Test) पाठवलेला इमरजन्सी संदेश असल्याने घाबरण्याचे कारण नाही. दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा अलर्ट पाठवला जाणार आहे. भविष्यात भूकंप, वीज कोसळणे, सुनामी किंवा गॅस गळतीसारख्या आपत्तींमध्ये नागरिकांपर्यंत तात्काळ सूचना पोहोचतात का, याची पडताळणी करण्यासाठी ही चाचणी घेतली जात आहे.(Cell Broadcast System Test)

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी भारत स्वतःची अलर्ट प्रणाली “सेल ब्रॉडकास्ट अलर्ट” विकसित करत असल्याची माहिती आहे. सध्या देशभरात प्रणालीची चाचणी सुरू आहे. जर तुमच्या मोबाईलवर एनडीएमए (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) कडून फ्लॅश एसएमएस आला असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. “NDMA तुमच्या परिसरात 2 मे 2026 रोजी Cell Broadcast Alerts ची चाचणी करणार आहे. मोबाईलवर हा संदेश प्राप्त झाल्यानंतर कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. 
तसेच घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीची माहिती थेट मोबाईलवर पोहोचवणे. मुख्य उद्देश आहे. आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठीच्या तयारीचा भाग म्हणून सरकारने स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणाली विकसित केली आहे. 

महत्त्वाचे म्हणजे, हा अलर्ट फक्त त्या मोबाईलवर येईल ज्यामध्ये संबंधित सेटिंग्स सुरू आहेत. अलर्ट आल्यावर स्क्रीनवर संदेश दिसेल आणि मोठा आवाज येईल. अशावेळी घाबरून न जाता ‘OK’ बटण दाबून तो बंद करता येईल किंवा संदेश दुर्लक्षही करता येईल. पूर्वी आपत्तीविषयक माहिती एसएमएसद्वारे पाठवली जात होती. मात्र, एसएमएस उशिरा पोहोचण्याची शक्यता असल्याने नवीन सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे एका विशिष्ट भागातील सर्व मोबाईलवर एकाच वेळी तात्काळ संदेश पोहोचतो. विशेष म्हणजे, यासाठी मोबाईलमध्ये नेटवर्क सिग्नल अत्यंत मजबूत असणेही आवश्यक नसते, कारण हा संदेश थेट टॉवरवरून फोनपर्यंत पोहोचतो. हे तंत्रज्ञान सी-डॉटने स्वदेशी पद्धतीने विकसित केले आहे.

चाचणीदरम्यान मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत संदेश येईल, ज्यामध्ये स्पष्टपणे ‘हा टेस्ट मेसेज आहे’ असे नमूद केलेले असेल. हा संदेश एकापेक्षा अधिक वेळा येऊ शकतो. नागरिकांनी फक्त संदेश वाचून ‘OK’ दाबावा किंवा दुर्लक्ष करावे. हा अलर्ट मिळण्यासाठी मोबाईलमधील आवश्यक सेटिंग्स सुरू असणे गरजेचे आहे. यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Safety and Emergency’ पर्यायातून ‘Wireless Emergency Alerts’ मध्ये ‘Test Alerts’ सुरू करता येतात. मात्र, प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी हा अलर्ट सेटिंग्स सुरू नसतानाही मोबाईलवर येऊ शकतो. हा सिस्टम विविध भारतीय भाषांमध्ये कार्यरत असल्याने नागरिकांना त्यांच्या भाषेत इशारे मिळू शकतील.

तुमच्या मोबाईलवर अचानक जोरात सायरन वाजला किंवा एखादा आपत्कालीन मेसेज आला, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्याकडून 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम'ची (Cell Broadcast System) चाचणी घेतली जात आहे. भविष्यातील नैसर्गिक आपत्तींच्या काळात नागरिकांना त्वरित सावध करण्यासाठी ही तयारी केली जात आहे.

Cell Broadcast System Test:  नेमकं काय होणार?

चाचणी दरम्यान, तुमच्या फोनवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये एक फ्लॅश मेसेज येईल. हा मेसेज आल्यावर फोनवर मोठा आवाज (बीप किंवा सायरन) येईल. हा मेसेज केवळ चाचणीचा भाग असून त्यावर तुम्हाला कोणतीही कृती करण्याची गरज नाही. तुम्ही तो मेसेज वाचून केवळ 'OK' बटण दाबून फोन ठेवू शकता.

Cell Broadcast System Test: SMS आणि सेल ब्रॉडकास्टमध्ये फरक काय?

पूर्वी सरकार 'सचेत' प्रणालीद्वारे SMS पाठवत असे. मात्र, SMS नेटवर्कच्या समस्येमुळे उशिरा पोहोचण्याची शक्यता असते. याउलट, 'सेल ब्रॉडकास्ट' तंत्रज्ञान एकाच वेळी ठराविक परिसरातील सर्व मोबाईलवर त्वरित पोहोचते. याची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
त्वरित प्रतिसाद: वीज पडणे, त्सुनामी किंवा गॅस गळती यांसारख्या कमी वेळ असलेल्या आपत्तींमध्ये हे अत्यंत प्रभावी आहे.
नेटवर्कची गरज नाही: हे तंत्रज्ञान थेट टॉवरवरून फोनपर्यंत पोहोचते, त्यामुळे मोबाईल सिग्नल कमकुवत असला तरीही अलर्ट मिळतो.
स्वदेशी बनावट: हे तंत्रज्ञान सी-डॉट (C-DOT) ने पूर्णपणे भारतात विकसित केले आहे.

Cell Broadcast System Test: तुमच्या फोनमध्ये ही सेटिंग तपासा

हा चाचणी मेसेज मिळवण्यासाठी तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्ज सुरू असणे आवश्यक आहे.
फोनच्या Settings मध्ये जा.
Safety and Emergency पर्यायावर टॅप करा.
त्यानंतर Wireless Emergency Alerts मध्ये जाऊन Test Alerts सुरू करा.
(टीप: प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी, सेटिंग्ज बंद असल्या तरीही सरकार तुमच्या फोनवर अलर्ट पाठवू शकते.)

Cell Broadcast System Test: बहुभाषिक सेवा

हे यंत्रणा केवळ हिंदी किंवा इंग्रजीपुरती मर्यादित नसून, विविध भारतीय भाषांमध्ये कार्य करेल. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला आपल्या मातृभाषेत धोक्याची सूचना समजेल आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचणे सोपे होईल.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Embed widget