एक्स्प्लोर

सॅरिडॉन, डी कोल्डसह 328 औषधांवर बंदी

केंद्र सरकारने सॅरिडॉन, डी कोल्ड, विक्स अॅक्शन 500 यासारख्या तातडीने आराम देणाऱ्या 328 औषधांवर बंदी घातली आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने सॅरिडॉन, डी कोल्ड, विक्स अॅक्शन 500 यासारख्या तातडीने आराम देणाऱ्या  328 औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी तत्काळ हा निर्णय लागू केला आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत. म्हणजेच कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करुन तयार केली जातात, औषध घेण्याची मात्रा (डोस) ठरलेली असते, अशा औषधांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन म्हटलं जातं. FDC औषधं आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. अनेक देशांमध्ये या औषधांना बंदी आहे. त्यात आता भारताचा समावेश झाला आहे. याव्यतिरिक्त सरकारने काही अटींवर 6 एफडीसीच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. या बंदीमुळे 1.18 लाख कोटी औषध उद्योगाला जवळपास 1500 कोटीचा फटका बसला आहे. ड्रग अॅडव्हायजरी कमिटीच्या शिफासरीप्रमाणे, या औषधांमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांच्या उपयुक्ततेबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. या औषधांच्या वापरामुळे सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकांचं हित लक्षात घेऊन ड्रग अॅडव्हायजरी बोर्डाने या औषधांचं उत्पादन, विक्री आणि वाटपावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. 21 सप्टेंबर 1988 च्या आधी उत्पादन करण्यात आलेल्या 15 औषधांना या आदेशातून तूर्तास वगळण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कमिटीनेही या औषधांचा अभ्यास केला होता. या कमिटीच्या रिपोर्टनंतर केंद्र सरकारने लोकांचं आरोग्य आणि हित लक्षात घेऊन 328 फिक्स डोस औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या औषधांवर बंदी ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये सॅरिडॉन, विक्स अॅक्शन 500, कोरेक्स, सुमो, जीरोडॉल, फेंसिडील, जिंटाप, डीकोल्ड आणि अनेक प्रकारच्या अँटिबायोटिक्स, पेन किलर्स, शुगर आणि हृदयरोगांवरील औषधांचा समावेश आहे. सध्या देशभारत अनेक FDC औषधं आहेत, जे देशभरात सर्वत्र उपलब्ध आहेत. आणखी जवळपास 500 औषधांवर बंदी येण्याची शक्यता आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात आव्हान दरम्यान, सरकारच्या या निर्णयाविरोधा औषध कंपन्यांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागालं! 1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करणं महागालं! 1 एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सविस्तर माहिती
Hormuz Strait : इराणने शब्द पाळला, दोन भारतीय LPG टँकर्सना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी
इराणने शब्द पाळला, दोन भारतीय LPG टँकर्सना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Blessing Muzarabani News : परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसीबी करणार बॅन
Virar Crime News: मोठी बातमी: विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत
Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Borivali National Park : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आज पुन्हा धावणार
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्हिस्टाडोम टॉय ट्रेनसह 'वनराणी' आजपासून पुन्हा धावणार
Embed widget