Gold Silver Price: सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  


सध्या चांदीला किती दर?


तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज (13 जून 2024 रोजी) सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीय. चांदीच्या दरात 2000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर कालच्या तुलनेत सोने 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, सध्या चांदी 88,500 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.


सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण


MCX मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्यामुळं सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 71,388 रुपयांवर आला आहे. तर बुधावारी हाच दर 71,970 रुपये होता. दरात घसरण झाल्यामुळं ग्राहकांना सोने खरेदीची मोठी संधी मिळाली आहे. 


भारतात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर?


दिल्ली - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो .
चेन्नई - 24 कॅरेट सोने 72,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो 
मुंबई -  24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो 
पाटणा - 24 कॅरेट सोने 72,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो 
पुणे - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो 
कोलकाता - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो 
नोएडा - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो 
लखनौ - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम 
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो 


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदी स्वस्त


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हचा अहवाल सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! सोन्याच्या दरात घसरण, चीनकडून सोनं खरेदीला ब्रेक, दरांवर परिणाम