Russia Ukraine crisis : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) देशात गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती होती. या युद्धजन्य (Russia Ukraine crisis) परिस्थितीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये (Gold) सुरक्षित गुंतवणूक केल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, युक्रेन-रशिया दरम्यान वाढलेल्या तणावात रशियाने काहीसं नमतं घेतलं. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात पाचशे रुपये कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात झालेले हे बदल पाहता ग्राहकांच्या मनात मात्र सोने खरेदी करावं की नको याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
काय आहेत महाराष्ट्रातील सोन्याचे दर ?
शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगांवच्या सुवर्ण नगरीत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढालही होत असते. मात्र, गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत झालेला चढ-उतार ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. दोन्ही देशातील युद्ध जन्य परिस्थितीमुळे सोन्याचे दर 55,000 हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवला जात होता. गेल्या दोन दिवसांत जळगावच्या सुवर्ण नगरीत जीएसटीसह (GST) 53 हजारांच्या उंबरठ्यावर सोन्याचा दर पोहोचल्याने त्याचा परिणाम ग्राहकांवरही झाला आहे.
या दरम्यान, ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचे होते त्यातील काही ग्राहकांनी सोन्याचे दर स्थिर होईपर्यंत खरेदी करणे थांबवले होते. तर, ज्यांना सोने घेणे गरजेचे होते त्यांनी नियोजनापेक्षा सोनं कमी घेणे पसंत केलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव होताच जगभरातील गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले. परंतु,दोन वर्षांपूर्वी सोन्याचे दर 58 हजारांच्या वर जाऊन पोहोचले. त्यानंतर गेल्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर 55 हजार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहक संभ्रमित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Crime News : धक्कादायक! फोटो स्टुडिओमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
- Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार'
- Beed : बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा; 90 लाखांच्या वसूलीचे प्रशासनाचे आदेश तर तक्रारदारांकडून आरोपींच्या अटकेची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha