Gold Mines : भारतात खजाना मिळाला! ओदिसामध्ये 9 ठिकाणी मिळाले सोन्याचे साठे
Gold Mines : ओदिसामधील तीन जिल्ह्यात नऊ ठिकाणी सोन्याचे साठे मिळाल्याची माहिती ओदिसा सरकारने दिली आहे.
Gold Mines : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात लिथियमचे साठे सापडले होते. त्यानंतर आता ओदिसामध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. ओदिसामधील तीन जिल्ह्यात नऊ ठिकाणी सोन्याचे साठे सापडल्याची माहिती ओदिसा सरकारने दिली आहे. देवगढ, क्योंझर आणि मयूरभंज येथे सोन्याचे नऊ साठे सापडले आहेत.
ओदिसाचे खाण मंत्री प्रफुल्ल मलिक (Steel and Mines Minister Prafulla Mallik) यांनी सोमवारी विधानसभेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, भूविज्ञान संचालनालय आणि GSI यांनी केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये क्योंझर, मयूरभंज आणि देवगड जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी सोन्याचे साठे असल्याचे समोर आले आहे. विधानसभेत विरोधी पक्षातील आमदार सुधीर कुमार सामल यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना खाण मंत्री प्रफुल्ल मलिक यांनी तीन जिल्ह्यात सोन्याचे साठे मिळाल्याची माहिती दिली.
ओदिसाचे खाण मंत्री प्रफुल्ल मलिक यांनी सांगितलं की, तीन जिल्ह्यात नऊ ठिकाणी सोन्याचे साठे मिळाले आहेत. क्योंझर जिल्ह्यातील दिमिरिमुंडा, कुशकला, गोटीपूर, गोपूर येथे सोन्याचे साठे मिळाले आहेत. त्याशिवाय मयूरभंज जिल्ह्यात जोशीपूर, सुरियागुडा, रुआंसिला, धुशूरा पहाडी आणि देवगढमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. GSI ने दोन वर्षांत तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा सर्वे केला होता. त्यात सोन्याच्या खाणी असल्याचे स्पष्ट झाले. परंतु हे सोने किती आहेत, याबाबत माहिती मिळाली नाही. या ठिकाणी मुबलक सोने मिळाल्यास भारत सौदीसारखा श्रीमंत देश होईल.
आणखी वाचा :
Share Market Updates : सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानींच्या स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर