एक्स्प्लोर

दूधसागर धबधब्याजवळील ओहळात पुण्याची तरुणी बुडाली

बसूला वाचवण्यासाठी तिच्या तीन सहकार्‍यांनी प्रयत्न केले, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघेही वाहून गेले.

पणजी : पुण्याहून गोव्यातील दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंगसाठी आलेली एक तरुणी ओहळात बुडाली. सोनावळी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर रविवारी सकाळी ही घडली. सुहागता बसू (वय 25 वर्ष) असं तरुणीचं नाव असून ती मूळची पश्चिम बंगालची आहेत. सुहागता बसू ही व्यवसायाने पीक महिंद्रा कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होती. बसूला वाचवण्यासाठी तिच्या तीन सहकार्‍यांनी प्रयत्न केले, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिघेही वाहून गेले. धडपड करुन त्यांनी झाडाच्या आधाराने स्वतःचा जीव कसाबसा वाचवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातून ट्रेकिंगसाठी दोन गट रविवारी पहाटे पाचच्या सुमारास निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून कुळेत आले होते. हे दोन्ही गट दूधसागर धबधब्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या सोनावळी स्थानकावर उतरले होते. 13 जणांच्या एका गटात सुहागता बसू आणि तिचा एक मित्र असे दोघेजण पुण्यातील आयटी सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी होते. तर इतरजण विविध भागातून आले होते. पोलिस निरीक्षक निलेश धायगोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस आणि वन विभागाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने सायंकाळी उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली. वनपाल परेश पोरोब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट वन विभागाच्या परवानगीशिवाय जंगलात गेला होता. तसंच त्यांच्याबरोबर एकही स्थानिक गाईड नव्हता. पुणे येथील एका ट्रेकर गाईडने हा ट्रेक आयोजित केला होता. यापूर्वीही दोनवेळा तो ट्रेकर्सना घेऊन दूधसागरवर आला होता अशी चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
Vande Bharat Train Mumbai Rain: मुंबईच्या पावसातील वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे ट्रॅकवरील पाणी फ्लायओव्हरवरील गाड्यांवर उडालं
मुंबईच्या पावसातील वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे ट्रॅकवरील पाणी फ्लायओव्हरवरील गाड्यांवर उडालं
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Embed widget