एक्स्प्लोर
खरच गोव्यात न्यूड पार्टी होणार का?
पार्टी मध्ये बॅले डान्स असणार असून त्याखेरीज डे यॉट न्यूड फन पार्टी, प्रायव्हेट आयलंड सेक्स पार्टी, लाईव्ह डीजे, मुजरा, न्यूड गर्ल डान्स आणि न्यूड पूल पार्टी, अनलिमिटेड फन असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

पणजी : प्रायव्हेट गोवा पार्टी, अनलिमिटेड सेक्स स्टाइल अॅण्ड क्लास विथ लक्झरी अॅण्ड कन्फर्ट अशा आशयाच्या एका जाहिरातीने सध्या गोव्यात धुमाकुळ घातला आहे. खरच अशा प्रकारची पार्टी गोव्यात होऊ शकते का? या बद्दल उलट सुलट चर्चा सध्या रंगात आली आहे.
सोशल मीडियावर याची जाहिरात वाऱ्याच्या वेगाने फिरु लागली आहे. जाहिरातीमध्ये उत्तर गोव्यातील मोरजी येथील दोन रस्त्यांचा उल्लेख असून एका व्यक्तीचा फोन नंबर देखील देण्यात आला आहे. जाहिरातीमध्ये न्यू कलेक्शनच्या नावे 10 ते 12 नग्न विदेशी युवती एकमेकांसोबत झोपल्याचा फोटो असून त्यात त्या युवतींचे चेहरे देखील दाखवण्यात आले आहेत. त्या फोटो खाली हाय डियर सर, वी ऑर्गनाइज प्रायव्हेट पार्टी इन गोवा, देअर इज 15 टू 20 फॉरेनर्स गर्ल्स, 10+ इंडियन्स असे वर्णन करण्यात आले आहे. म्हणजे 15 ते 20 विदेशी युवती आणि 10 हून अधिक भारतीय युवती या पार्टीचे आकर्षण असणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
VIDEO | माझा 20-20 | महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा | एबीपी माझा
पार्टीबद्दल अधिक माहिती देताना अनलिमिटेड सेक्स अनलिमिटेड गर्ल्स अनलिमिटेड लिकर अॅण्ड फूड अर्थात खा, प्या आणि मजा करा अशी व्यवस्था पार्टी मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधुन घेण्यात ही जाहिरात यशस्वी ठरली आहे.
पार्टी मध्ये बॅले डान्स असणार असून त्याखेरीज डे यॉट न्यूड फन पार्टी, प्रायव्हेट आयलंड सेक्स पार्टी, लाईव्ह डीजे, मुजरा, न्यूड गर्ल डान्स आणि न्यूड पूल पार्टी, अनलिमिटेड फन असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
पार्टी नेमकी कुठे, किती वाजता आणि कोणत्या तारखेला होणार याचा उल्लेख नसला तरी मोरजी येथील आश्वेम रस्ता आणि गावडेवाडा रस्ता अशा दोन रस्त्यांचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. सोशल मीडिया वर ही जाहिरात व्हायरल होऊ लागताच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून पोलिसांच्या क्राइम ब्रांचतर्फे अशी पार्टी खरोखरच होणार आहे का याचा तपास आता सुरु झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
