एक्स्प्लोर

अल्पवयीन मुलीची खरेदी करुन बलात्कार, आमदाराला अटक

पणजी : अल्पवयीन मुलीची खरेदी करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गोव्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाबूश मॉन्सेरात यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस मागील काही दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. आमदार मॉन्सेरात यांनी गुरुवारी पणजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर त्यांना अटक केली.   काय आहे प्रकरण? या प्रकरणात आई-मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय तक्रारदार मुलगी मूळची नेपाळची आहे. सावत्र आई आणि आणखी एका महिलेने मला 50 लाख रुपयांत मॉन्सेरात यांना विकल्याचा आरोप मुलीने केला आहे. या प्रकरणी आईविरोधात पणजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पणजीच्या महिला पोलिस ठाण्यात हे प्रकरण हस्तांतरित करण्यात आलं.   अनेक वेळा मुलीचं लैंगिक शोषण मार्च महिन्यात मॉन्सेरात यांनी मुलीची खरेदी केली होती. त्यानंतर मॉन्सेरात यांनी त्यांच्या बंगल्यावर  मुलीला कैद करुन ठेवलं होतं. धमकी देऊन त्यांनी अनेकदा मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मॉन्सेरात यांच्यावर बलात्कार करणे, इजा पोहोचवणे, फसवणूक करुन कैदेत ठेवणे, व्यक्तीची खरेदी करुन शोषण करणे या गुन्ह्याअंतर्गत भारतीय दंड विधान, गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत (POCSO) कलम 376, 328, 342, 370(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   हे राजकीय षडयंत्र : बाबूश मॉन्सेरात बाबूश मॉन्सेरात हे सेंट क्रूझ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र काही काळापूर्वीच त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली.   दरम्यान, "मॉन्सेरात यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हे माझ्याविरोधातील राजकीय षडयंत्र आहे," असं मॉन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.   "माझ्या शोरुमची देखरेख करण्यासाठी मी त्या मुलीला नियुक्त केलं होतं. त्याआधी मी तिच्या आई-वडिलांशी बोललो होतो, जे माझ्याच मतदार संघात राहतात. चार हजार रुपयांची चोरी करताना आढळल्याने मुलीची हकालपट्टी करण्यात आली," असं मॉन्सेरात म्हणाले.   पणजी पोलिसांनी मॉन्सेरात यांच्या शोरुमसह अनेक संशयित ठिकाणांची झाडाझडती घेतली. पुढील तपास पणजी पोलिस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi News : ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
ना कॅश, ना क्रेडिट कार्ड! परदेश दौऱ्यावर पंतप्रधान मोदी पेमेंट कसे करतात? पैसे कसे देतात? 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Embed widget