एक्स्प्लोर

Goa : गोव्यातही महाराष्ट्राचा फॉर्म्युला? काँग्रेसचे आमदार पक्ष न सोडता वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत

Goa Congress Crisis : गोव्यातील काँग्रेस आमदार वेगळा गट करुन प्रमोद सावंत यांना बाहेरुन पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. 

पणजी: महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही राजकीय घडामोडींना वेग आला असून गोव्यातही महाराष्ट्राचा फॉर्म्युला अंमलात येण्याची शक्यता आहे. गोवा काँग्रेसमधील 11 पैकी आठ आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वत:चा एक गट करण्याच्या तयारीत आहेत. ते भाजप सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्ष न सोडता स्वत:चा एक गट तयार केला आणि त्यांनी भाजपच्या मदतीने सरकार बनवलं. आता याची पुनरावृत्ती गोव्यातही होण्याची शक्यता असून गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पुढील कार्यवाहीसाठी आज दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत. 

गोवा काँग्रेसमधील 11 पैकी आठ आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यात आता ही ताजी अपडेट येत आहे. पण काही केलं तरी काँग्रेसमधील फूट अटळ असल्याचं चित्र आहे. गोव्यातील काँग्रेसचे एक-एक आमदार आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपर्कात येत आहेत. विरोधी पक्ष नेते मायकल लोबो, काँग्रेस आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. 

गोव्यातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश असून ते देखील भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. यापूर्वी 2019 मध्येही काँग्रेसला धक्का देत अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की काय? अशा चर्चांनी जोर धरला आहे. दिगंबर कामत, मायकल लोबो, युरी आलेमाओ, संकल्प आमोणकर, डेलाला लोबो, अॅलेक्स सिक्कारो, केदार नायक आणि राजेश फळदेसाई काँग्रेसमधील हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. 

 

महत्त्वाच्या बातम्या

मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
धक्कादायक! चौरी चौरा एक्सप्रेस रुळावरुन घसरली,  रेल्वे अपघातामुळं प्रवाशांमध्ये घबराट, अधिकारी घटनास्थळी दाखल
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Embed widget