Go First Flights: आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट (Go First) या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे. 


डीजीसीएने (DGCA) गो फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी देखील गो फर्स्टने लवकरात लवकर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची 30 मे पर्यंतची सर्व विमानं रद्द करण्याची घोषणा केली. सुरुवातील फक्त दोन दिवसांसाठी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती, मात्र आता ही उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.


'लवकरच सेवा पुन्हा सुरु करु'


गो फर्स्टकडून त्यांच्या विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्या नंतर त्यांनी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. तसेच लवकरच सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात येत आहे.  डीजीसीएकडून गो फर्स्टला त्यांच्या व्यवस्थापनामध्ये तसेच विमानांमध्ये अधिक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता गो फर्स्टकडून जी माहिती डीजीसीएसमोर सादर करण्यात येईल त्यानंतर कंपनीबाबत डीजीसीएकडून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


याआधीदेखील 9 मे पर्यंत गो फर्स्टने ऑपरेशनल कारणास्तव त्यांच्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द केली होती. गो फर्स्ट सध्या आर्थिक संकटाचा सामाना करत आहे. तसेच डीजीसीएने गो फर्स्टला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.  त्यानंतर गो फर्स्टने  NCLT कडे (National Company Law Tribunal) धाव घेतली होती, पण तिथूनही कंपनीला निराशा मिळाली. एनसीएलटीने (NCLT) गो फर्स्टच्या (GoFirst) याचिकेवर सुनावणी करताना, आयबीसी (ICB) अंतर्गत कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत कंपनीला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. 






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Railway Without Ticket: विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई; एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये