एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धक्कादायक : मासिक पाळी नसल्याचं सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींची तपासणी
मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासल्याचं समजत आहे.
गुजरात : मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी भूजमधल्या एका कॉलेजने 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
मासिक पाळीमुळे नियमांचे उल्लंघन केले जाते असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला. त्यामुळे त्यांनी या विद्यार्थिनींचे कपडे, अंतर्वस्त्रे उतरवून मासिक पाळी सुरु आहे की नाही हे तपासल्याचं समजत आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या विश्वस्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
भुजमधील एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळीत कोण आहे याची तपासणी करण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढायला बळजबरी केली. हॉस्टेलच्या वॉर्डनने काही मुली मासिक पाळीत असताना हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात जातात, मंदिराच्या आसपास फिरतात तसेच इतरांना स्पर्श करतात अशी तक्रार केली. नंतर काही मुलींना वॉशरूममध्ये त्वरित नेण्यात आले आणि त्या मासिक पाळीत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांचे अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यात आली. मुलींकडून मासिक पाळी संदर्भात घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन होतं आहे. त्यामुळे ही तपासणी करण्यात आली. गुरुवारी झालेल्या प्रकारानंतर 68 मुलींनी आंदोलन केलं आणि संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या पालकांना हा धार्मिक मुद्दा आहे त्यामुळे हे प्रकरण इथेच संपवा असे सांगितले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही. मात्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे असंही या वृत्तात म्हटलं आहे. VIDEO | मासिक पाळीचं नियोजन कसं कराल? | आरोग्य | एबीपी माझाGujarat: 68 girl students of Shree Sahajanand Girls Institute (SSGI) in Bhuj were reportedly asked to remove their innerwear to prove that they were not menstruating. pic.twitter.com/fG0YZZNd70
— ANI (@ANI) February 14, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
करमणूक
क्राईम
Advertisement