GHMC Election Voting Live Updates: राज्यात विधानपरिषद शिक्षक-पदवीधर तर हैदराबादमध्ये महापालिकेसाठी आज मतदान

GHMC, Hyderabad Municipal Corporation Election Polling Live Updates: राज्यात विधानपरिषद शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी मतदान होत आहे. तर तेलंगाणा राज्यात ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Dec 2020 07:42 PM
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक: अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक 6 हजार 88 मतांनी आघाडीवर, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 5 हजार 122 मतांनी द्वितीय क्रमांकावर. शिक्षक महासंघाचे उमेदवार शेखर भोयर 4889 मतांनी तृतीय क्रमांकावर.
पुणे पदवीधर मतदारसंघ :


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांची आघाडी कायम, प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांच्या पेक्षा साधारण दहा हजार मतांनी पुढे, आतापर्यत 65 ते 70 हजार मतांची मोजणी


शिक्षक मतदारसंघ -

काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम दत्तात्रय सावंत यांच्या पेक्षा चार हजार पाचशे मतांनी पुढे, साधारण साडे 36 हजार मतांची मोजणी
नागपूर पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीत
काँग्रेसचे अभिजित वंजारी 4 हजार 850 मतांनी पुढे

आज झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेत सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी पंढरपूर शहरातील द. ह. कवठेकर प्रशालेत एक मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे . आज या मतदान केंद्रावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असताना खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट एक मतदान केंद्रात घुसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी घेतला आहे. वास्तविक आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार मतदान प्रक्रियेतील कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी , निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसताना भाजप खासदार थेट मतदान केंद्रात गेले होते . यावर आक्षेप घेताच आपणास मतदान केंद्रास भेट देऊन योग्य पद्धतीने मतदान सुरू आहे का हा पाहण्याचा अधिकार असल्याचा दावा खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. उद्या राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर येथे लेखी तक्रार दिली जाणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यामध्ये चुरशीने मतदान. जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 64.60 तरी शिक्षक मतदार संघासाठी 84.43 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ सोलापूर : पदवीधर मतदार संघ 52.10% तर शिक्षक मतदार संघ 77.12%
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक :आज झालेल्या मतदानामध्ये सरासरी 61 टक्के मतदान. मतदानाचा टक्का वाढला गत निवडणुकीत 37 टक्के मतदान झाले होते.
परभणीत सकाळी 8 ते 5 दरम्यान एकूण 67.43 % मतदान; 32,715 पैकी 22,062 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पदवीधर निवडणुकीत मराठवाड्यात अंदाजे 63.5 टक्के मतदान
विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ (जिल्हा : सोलापूर):


पुरुष पदवीधर मतदार: 42070, स्त्री पदवीधर मतदार: 11742, इतर (TG) पदवीधर मतदार: 1, एकूण पदवीधर मतदार: 53813 सकाळी 8 ते 5 या कालावधीत झालेले मतदान, पुरुष: 27170, स्त्री: 6229एकूण : 33, 399 मतदान, टक्केवारी : 62.07%

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ (जिल्हा : सोलापूर):

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 74), पुरुष शिक्षक मतदार: 10,561, स्त्री शिक्षक मतदार : 3023, एकूण शिक्षक मतदार: 13584
सकाळी 8 ते 5 कालावधीत झालेले मतदान, पुरुष: 9225, स्त्री: 2371, एकूण : 11,558, मतदान टक्केवारी : 85.09%
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चार वाजेपर्यंत 52.69 तर शिक्षक मतदारसंघासाठी 76.69 टक्के मतदान.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक : परभणीत सकाळी 8 ते 4 दरम्यान 58.63 % मतदान.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2020 : दुपारी 4 पर्यंत अमरावती विभागात 68.65 टक्के मतदान.
जालना जिल्हा : 4:00 पर्यंत एकूण मतदान 55.00%.
नागपूर पदवीधर मतदारसंघात दुपारी 4 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान.
वर्धा : पदवीधर मतदारसंघाकरिता 4 वाजेपर्यंत 56 %टक्के मतदान
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघासाठी 4 पर्यंत 54.16 टक्के मतदान
सांगली : मतदान टक्केवारी 4 वाजेपर्यंतची : पुणे पदवीधर 52.69 टक्के तर शिक्षक मतदार संघात 76.69 टक्के मतदानाची नोंद.
सांगली : पुणे पदवीधर 36.68 टक्के तर शिक्षक मतदार संघात 57.31 टक्के मतदानाची नोंद.
आमदार प्रणिती शिंदे पदवीधर मतदानापासून वंचित. मतदार नोंदणी न केल्याने मतदान करता न आल्याची माहिती. "आधी नोंद झालेल्या मतदारांची यादी कायम ठेवून नवीन मतदरांची पुरवणी यादी तयार करावी"
चंद्रपूर : पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत 18.94 टक्के मतदान
औरंगाबाद विभाग पदवीधरसंघ मतदान. दुपारी 12 पर्यंत 20.73 टक्के मतदान. सर्वाधिक 24.24 टक्के मतदान परभणीत
पुणे :
पुणे पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अभिजीत बीचुकले यांचे नाव मतदान यादीतून गायब झालं आहे. प्रशासनाचा हा भोंगळ कारभार असल्याची टीका अभिजित बीचुकले यांनी केली आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर ते त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या बरोबर आले असताना मतदान यादीत आपले नाव नसल्याचे समजल्यानंतर काही वेळ बूथ वर त्यांनी गोंधळ घातला. अलंकृता बिचुकले यांच्या नावाखाली नारायण बिचुकले नाव असल्याने या सर्व यंत्रणेचे खापर त्यांनी भाजप पक्षावर फोडल आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज (1 डिसेंबर) मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. तर तिकडे तेलंगाणा राज्यात ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.


 


राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.


 


महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.


 


ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणूक


 


ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सद्यस्थितीत 1122 उमेदवार रिंगणात आहेत, त्यात 150 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. हैदराबाद हा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप सुरुंग लावण्याची प्रयत्न करीत आहे. याची सुरुवात विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आपला आधार मजबूत करून सुरूवात केली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून 4 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल.


 


मागील वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्ष तेलंगना राष्ट्र समितीने (टीआरएस) विजय मिळविला होता. टीआरएसने 99 जागा जिंकल्या. त्याच वेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष एआयएमआयएमलाही 44 जागा मिळाल्या. पण यावेळी भाजपने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.