एक्स्प्लोर

Gaziabad: गाझियाबादमध्ये एलईडी टीव्हीचा ब्लास्ट; 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, दोन जण जखमी

एलईडी टीव्हीचा ब्लास्ट झाल्यानं एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गाझियाबादमधील टीला मोड पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी  ही घटना घडली.

Gaziabad: उत्तर प्रदेशमधील  गाझियाबादमध्ये (Gaziabad) एलईडी टीव्हीचा ब्लास्ट झाल्यानं एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर त्या मुलाची आई आणि एक मित्र या ब्लास्टमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमधील टीला मोड पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी  ही घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस या प्रकरणाचा तपासणी करत आहेत. 

LED टीव्हीमध्ये स्फोट झाल्याची ही घटना गाझियाबादच्या टीला मोड पोलीस स्टेशन परिसरातील हर्ष विहारमध्ये घडली. रहिवासी निरंजन यांचा 16 वर्षीय मुलगा करण हा त्याच्या मित्रासोबत घरात एलईडी टीव्हीवर कार्यक्रम पाहत होता. यादरम्यान करणची आई ओमवतीही तेथे पोहोचली.अचानक एलईडी टीव्हीचा जोरात स्फोट झाला.  तेथे उपस्थित असलेले तिघेही जखमी झाले. स्फोट झाल्यानंतर टीव्ही ज्या भिंतीवर लावला होता ती भिंत तुटली. 

उपचारादरम्यान करणचा मृत्यू

ब्लास्टचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक करणच्या घरामध्ये आले. त्यावेळी त्यांनी करणची आई ओमवती, त्याचा मित्र ओमेंद्र आणि करण यांना जखमी अवस्थेत दिसले. ब्लास्टचा आवाज एवढा मोठा होता की, अजूबाजूच्या लोकांना वाटले एखाद्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. त्यानंतर जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान करणचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिली माहिती 
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलीस हे सध्या अपघाताच्या कारणाची तपासणी करत आहेत. मात्र, टीव्हीचा स्फोट होण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. एलईडी टीव्हीचा स्फोट हाय व्होल्टेजमुळे झाल्याचा संशय आहे. या घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घराची पाहणी केली.

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

 'घरात इतर कोणतीही ज्वलनशील वस्तू नव्हती. घरातील एलईडी टेलिव्हिजन हे एकमेव उपकरण होते ज्याचा स्फोट झाला.', अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.  या आघातामुळे, ज्या खोलीत टीव्ही ठेवण्यात आला होता. त्या संपूर्ण खोलीला तडे गेले आणि नुकसान झाले, असे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कुमार सिंह यांनी सांगितले.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्य: 

Punjabi Family Kidnapped : अमेरिकेत पंजाबी कुटुंबाचे अपहरण, आई वडिलांसह आठ महिन्याच्या चिमुकलीचा समवेश

 

 

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget