रायपूर : छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामध्ये आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी आहेत. छत्तीसगड सरकारच्या 'स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया' (सेल) मार्फत हा प्लांट चालवला जातो.


भिलाई स्टील प्लांटमध्ये सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी स्फोट झाला. स्फोटाचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. राजधानी रायपूरपासून 30 किमी अंतरावर दुर्ग जिल्ह्यात हा प्लांट आहे.

जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय रेल्वेच्या जागतिक दर्जाच्या रुळांसाठी 'भिलाई स्टील प्लांट' हा देशातील एकमेव उत्पादक आणि पुरवठादार आहे. भिलाई स्टील प्लांटच्या आधुनिक आणि विस्तारित प्रकल्पाचं जून महिन्यात पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं होतं.