COVID-19 Booster Dose : कोरोना लसीकरणातील दुसरा डोस घेण्यासाठी आणि त्यानंतर बूस्टर डोस घेण्यासाठी नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती... मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण18 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं अंतर कमी करण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील आणि बूस्टर डोसमधील (Booster Dose) अंतर नऊ महिन्यावरुन सहा महिने करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. एसटीएससीने लसीच्या दोन डोसमधील अंतर नऊ महिन्यावरुन सहा महिने करावे, अशी शिफारस केली होती.
वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (STSC) स्थायी तांत्रिक उप-समितीने (NTAGI) कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर नऊ महिन्यावरुन सहा महिने केले आहे. म्हणजेच यापुढे कोरोना लसीचा दुसरा डोस अथवा बूस्टर डोस घेण्याचा कालावधी सहा महिने अथवा 26 आठवडे, असा करण्यात आलाय आहे. याला NTAGI ने देखील दुजोरा दिला आहे.
बूस्टर डोसचा कालावधी घटवला -
आरोग्य विभागाचे सचिव म्हणले की, दहा ते 59 वर्षांपर्यंत लस घेण्यास पात्र असणाऱ्यांना दुसऱ्या डोसला तीन महिने अथवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येईल. यांना 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसोबत फ्रंट लाईन वर्कर यांनाही सहा महिन्यानंतर बूस्टर डोस दिला जाईल.
को-विनच्या नियमांत बदल
नवीन व्यवस्थेच्या सुविधेसाठी कोविनच्या प्रणालीमध्ये बदल करण्यात आले आहेत. याबाबत सर्व संबधित आधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाच्या सचिवाने स्पष्ट केले. याआधी बूस्टर डोस अथवा दुसरा डोस नऊ महिने अथवा 39 आठवड्यानंतर दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. आज आरोग्य विभागाकडून ही मर्यादा कमी करण्यात आली आहे.
लसीकरणाने 198.20 कोटी डोसचा पल्ला केला पार -
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.20 (1,98,20,86,763) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,59,16,027 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.70 (3,70,80,378) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.