मुंबई : दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईस जेटचे (SpiceJet SG-11) कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. या घटनेनंतर स्पाईसजेटद्वारे वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेनंतर वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण गेल्या सात महिन्यात काही तांत्रिक अडचणींमुळे 20 विमानांचे आपत्कालीन लँडिंग कराण्यात आले. त्यामध्ये स्पाईसजेटने 11 वेळा एमर्जन्सी लँडिंग केले आहे.
हवामान रडारमध्ये बिघाड, विमानात तांत्रिक बिघाड, विंडशील्डला तडा अशा अनेक कारणांमुळे 2022 साली 20 वेळा विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दोन हजारपेक्षा अधिक प्रवाशांना याचा फटका बसला आहे. याध्ये स्पाईसजेटमध्ये सर्वाधिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
दम्यान, या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटिस देखील दिली आहे. "आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता आहे. याबाबतचा अहवालही आम्ही मागितला आहे. परंतु मागील सात महिन्यात घडलेल्या घटना पाहता भारतात हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.भारतातील हवाई वाहतुकीमध्ये समस्या काय आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे
भारतातील हवाई वाहतुकीतील समस्या काय आहेत?
अप्रशिक्षित वैमानिक
एप्रिल 2022 साली, डीजीसीएने स्पाईसजेट आणि वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या CSTPL ला 90 वैमानिकांना व्यवस्थित प्रशिक्षण न दिल्यामुळे कारणे दाखवा नोटिस बजावली होती.
वैमानिकांची कमतरता
दरवर्षी भारतात विविध संस्थांमधून 500-800 वैमानिक प्रशिक्षण घेतात. परंतु हवाई वाहतुकीकडे लोकांचा वाढता कल पाहता वर्षाला हजार वैमानिकांची गरज आहे. म्हणजे पुढील पाच हजार कुशल वैमानिकांची भारताला गरज आहे.
(Above Photo Source : Ministry of Civil Aviation)
ड्रंक ऑन ड्युटी
जानेवारी 2021 ते मार्च 2022 या वर्षात 42 विमानतळावरील 84 कर्मचारी कामावर असताना दारूचे सेवन केल्याचे डीसीजीएला आढळले आहे. या 84 कर्मचाऱ्यांपैकी 64 टक्के कर्मचारी ब्रेथ अॅनालायझर अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळले. तसेच 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान डीसीजीएने 9 वैमानिक आणि 32 कर्मचाऱ्यांना ब्रेथ अॅनलायझरमध्ये दोषी आढळल्याने निलंबीत करण्यात आले आहे.
संंबंधित बातम्या :
SpiceJet : अखेर 138 भारतीय प्रवासी दुबईत; 11 तासांपासून कराचीत होते ताटकळले
SpiceJet: तांत्रिक बिघाडामुळे भारतीय विमानाचं कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग, सर्व प्रवासी सुखरुप