एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बेळगावात अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार
बेळगाव : बेळगावमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. 15 फेब्रुवारी दिवशी हा सर्व प्रकार घडला. पीडित तरुणीनं काल पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उजेडात आलं आहे. तरुणी आपल्या मित्रासमवेत काकतीजवळील डोंगरावर फिरायला गेली असताना पाच व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळची धारवाडची असणारी 17 वर्षीय तरुणी 15 फेब्रुवारीला आपल्या मित्रासोबत काकती डोंगरावर फिरायला गेली होती. निर्जन परिसर असल्यानं त्याठिकाणी असणाऱ्या पाच जणांनी तरुणीच्या जबरदस्तीनं ओढून नेलं, तसंच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं.
पीडित मुलीनं आणि तिच्या मित्रानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुत्यानटी गावचे असून पोलिसांनी चार संशयित आरोपीना ताब्यात घेतलं आहे. तसंच अन्य दोघांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement