एक्स्प्लोर

वीरपुत्र शहीद प्रफुल्ल मोहरकर अनंतात विलीन

भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय इतमामात अखेरची सलामी दिली.

भंडारा : जम्मू-काश्मीरच्या राजौरी भागात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या वीरपुत्राला रात्री अखेरची सलामी देण्यात आली. शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतून जनसागर लोटला होता. भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय इतमामात अखेरची सलामी दिली. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यात भारताचे चार जवान शहीद झाले असून शहीदांमध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचाही समावेश आहे. दुर्देव म्हणजे शहीद मोहरकर यांच्या लग्नाचा काल चौथा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आई-वडिल असा परिवार आहे. शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचा अल्पपरिचय मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे 36 वर्षांचे होते. ते मूळचे भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील पवनी शहरातील. बारावीनंतर त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. मात्र देशसेवेचा ध्यास मनाशी बाळगलेल्या प्रफुल्ल यांनी NDA मध्ये प्रवेश मिळवला. आठ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. पदोन्नती होऊन प्रफुल्ल मोहरकर मेजर पदावर पोहोचले. चार वर्षांपूर्वी प्रफुल्ल यांचं अवोली यांच्याशी लग्न झालं होतं. प्रफुल्ल यांचे वडील अंबादास मोहरकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत, आई शिक्षिका आहे. लहान भाऊ परेश हा पुण्यात नोकरी करतो. जुनोना या गावात प्रफुल्ल यांचं प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक आणि त्यापुढील सर्व शिक्षण बाहेर झालं. मरण प्रत्येकालाच येतं, मात्र देशासाठी दर जीव गेला तर अभिमानच वाटेल, असं कायम सांगणाऱ्या प्रफुल्ल मोहरकर हे देशासाठी लढता लढता शहीद झाले.

संबंधित बातमी : लग्नाच्या वाढदिनी महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget