एक्स्प्लोर

नोटाबंदीनंतर 18 दिवसात 300 कोटींची 'काळीमाया' जप्त

नवी दिल्ली/ मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा करुन आज 18 दिवस झाले आहेत. या 18 दिवसांच्या कालावधीत देशाच्या विविध भागातून 500 आणि 1000 रुपयांची 300 कोटींंची काळीमाया जप्त केली आहे. 24 तासात दोन विमानतळांवरुन 8 कोटी जप्त नोटाबंदीच्या निर्णयाचा आज 18 वा दिवस असला, तरी गेल्या 24 तासात दिल्ली आणि मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरुन तब्बल 8 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई विमानतळावरुन तब्बल 5 कोटी रुपये, तर दिल्ली विमानतळावरुन 3 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुण्यातून 1 कोटी जप्त या निर्णयामुळे बिल्डर लॉबीचे धाबे चांगलेच दणाणले असून, पुण्यातील बांधकामाचे साहित्य पुरवणाऱ्या भारत शाह याच्याकडून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अनेक ठिकाणांहून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. नागपूरमधून जुन्या नोटांसोबत नोटा मोजणारे मशीन जप्त नागपूरमधूनही 500 आणि 1000 रुपयांच्या 1 कोटी रुपयांच्या नोटासोबतच नोटांची मोजणी करणारे मशीन जप्त करण्यात आले आहे. छत्तीसगडच्या कोंडगावमधून 44 लाख जप्त छत्तीसगडमधील कोंडगावमधून 44 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक व्यक्ती संशयास्पद पैसे घेऊन जात असताना आढळल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. 2000च्या नव्या नोटांचीही ब्लॅकमनी जप्त विशेष म्हणजे, देशाच्या विविध भागांतूनही करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी 27 लाखांच्या नव्या 2000 रुपयांच्या नोटांची ब्लॅकमनी जप्त केली आहे. ही रक्कम हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाजवळून एका फॉर्च्यूनर गाडीतून जप्त करण्यात आली. या सर्व नोटा मुंबईमध्ये बदलून दिल्लीत आणल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. नाकाबंदी दरम्यान जुन्या नोटा जप्त नाकाबंदी दरम्यान हरियाणा पोलिसांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी घेऊन जात असताना जप्त केल्या आहेत. ही रक्कम जवळपास 2 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वोत्तर राज्यांमधूनही जुन्या नोटा जप्त पूर्वोत्तर राज्य मणिपूरमधूनही 500 आणि 1000 रुपयांच्य जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मणिपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 44 लाख रुपयांचे काळेधन जप्त करण्यात आले आहे. 18 दिवसात 300 कोटी जप्त अशाप्रकारे देशाच्या विविध भागामधून गेल्या 18 दिवसांत 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाची ब्लॅकमनी धारकांना धडकी भरली आहे. दरम्यान, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरील पोलिसांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget