मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. आज पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 11 पैशांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 87.89 रुपये तर डिझेल 77.09 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे.
राज्याच परभणीत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसनं 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधीपक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनीदेखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं.
9 दिवसात पेट्रोल 1.80रुपयांनी महागलं
गेल्या सात दिवसात पेट्रोल सातत्याने वाढत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.89 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1 रुपये 80 पैशांची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर
मुंबई
पेट्रोल 86.09 रुपये
डिझेल 77.09 रुपये
परभणी
पेट्रोल 89.68 रुपये
डिझेल 77.63 रुपये
जळगाव
पेट्रोल 88.86 रुपये
डिझेल 76.84 रुपये
नंदुरबार
पेट्रोल 88.69 रुपये
डिझेल 76.95 रुपये
धुळे
पेट्रोल 87.94 रुपये
डिझेल 75.99 रुपये
बुलडाणा
पेट्रोल 89.40 रुपये
डिझेल 77.10 रुपये
नांदेड
पेट्रोल 88.37 रुपये
डिझेल 77.34 रुपये
संबंधित बातम्या
पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर!
पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल
इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच
डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं
पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका कायम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2018 10:19 AM (IST)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात या महिन्यात सलग नवव्या दिवशी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर 87.89 रुपये तर डिझेल 77.09 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -