मुंबईइंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. त्याला अनेक विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. मात्र आजही पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेच आहेत. पेट्रोल आणि डिझेल आज 23 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईतील आजचा पेट्रोल दर 88 रुपये 12 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 77 रुपये 32 पैसे प्रति लिटर असा आहे.

या महिन्याच्या सुरुवातीपासून सलग दहाव्या दिवशी ही दरवाढ आहे.

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीत आहे. परभणीत पेट्रोलचा दर 89.88 रुपये लिटर आहे. तर दुसऱ्या नंबरवरील अमरावतीत आजचा पेट्रोलचा दर तब्बल 89.37 रुपये इतका आहे.

पेट्रोल दराने शंभरी गाठायला आता फक्त 11 रुपयांची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला आणि दैनंदिन आयुष्यातील इतर वस्तूही 5 ते 8 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

10 दिवसात पेट्रोल 1 रु 80 पैशांनी महागलं

गेल्या दहा दिवसात पेट्रोल सातत्याने महागतंय. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 88.12 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1 रुपये 80 पैशांची वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

मुंबई
पेट्रोल- 88.12 रुपये
डिझेल 77.23 रुपये

परभणी
पेट्रोल 89.88 रुपये
डिझेल 77.83 रुपये

अमरावती

पेट्रोल – 89.37

डिझेल – 78.60

पुणे –

पेट्रोल 87.91 रुपये
डिझेल 75.93 रुपये

ठाणे –

पेट्रोल रुपये
डिझेल रुपये

नाशिक –

पेट्रोल 88.50 रुपये
डिझेल 76.50रुपये

औरंगाबाद

पेट्रोल 89.17 रुपये
डिझेल 78.38 रुपये

नागपूर –

पेट्रोल 88.60 रुपये
डिझेल 77.84 रुपये

जळगाव
पेट्रोल 89.09 रुपये
डिझेल 77.07  रुपये

नंदुरबार
पेट्रोल 88.98 रुपये
डिझेल 76.91 रुपये

धुळे
पेट्रोल 88.05 रुपये
डिझेल 76.07 रुपये

नांदेड
पेट्रोल 88.71 रुपये
डिझेल 77.68 रुपये

संबंधित बातम्या 

पेट्रोलची टिच्चून आगेकूच, शतकापासून 12 रुपये दूर! 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल  

इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ  

स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच  

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं