France Flight Grounded in India : मानवी तस्करीच्या (Human Trafficking) आरोपाखाली फ्रान्समध्ये (France) थांबवलेलं रोमानियन विमान प्रवाशांसह मुंबईत (Mumbai) दाखल झालं आहे. या विमानात 303 प्रवासी होते, त्यापैकी फक्त 276 प्रवासी भारतात (India) परतले आहेत. इतर प्रवाशांपैकी अनेकांनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला असून दोन प्रवाशांवर आरोपही दाखल करण्यात आले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत. फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया X वर पोस्ट करत लिहिलं आहे की, "परिस्थिती लवकरात लवकर सोडवल्याबद्दल फ्रेंच सरकार आणि वात्री विमानतळाचे आभार." 


फ्रान्समध्ये थांबवलेलं विमान मुंबईत दाखल


मानवी तस्करीच्या (Human Trafficking) आरोपांमुळे फ्रान्समध्ये थांबवलेल्या विमानाने सोमवारी, 25 डिसेंबरला मुंबईसाठी उड्डाण केलं. मानवी तस्करीच्या संशयावरून शुक्रवारी 22 डिसेंबरला मुंबईला जाणारे विमान पॅरिसजवळील विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. या विमानात 303 प्रवासी होते, त्यात बहुतांश प्रवासी भारतीय होते. यातील भारतीय प्रवाशांसह 276 प्रवाशांसह विमान भारतात दाखल झालं आहे. यामुळे भारत सरकारने फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत.


मानवी तस्करीचा आरोप


मानवी तस्करीच्या आरोपावरून फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेले भारतीय प्रवाशांसह 303 प्रवाशांना घेऊन विमान मुंबईत पोहोचलं आहे. या विमानाने 276 प्रवासी भारतात पोहोचले आहेत. विमानाने फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावरून 25 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता उड्डाण केलं आणि मंगळवारी पहाटे 4 वाजता हे विमान मुंबईत उतरलं.






303 प्रवाशांसह विमान फ्रान्समध्ये रोखलं


चार दिवसांपूर्वी निकाराग्वाला जाणारे रोमानियन कंपनीचं विमान फ्रान्सजवळील व्हॅट्री विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. या चार्टर विमानाने 303 प्रवाशांना घेऊन दुबई, संयुक्त अरब अमिराती येथून उड्डाण केलं होतं. मानवी तस्करीच्या संशयावरून 21 डिसेंबरला पॅरिसपासून 150 किमी पूर्वेला विट्री विमानतळावर हे विमान थांबवण्यात आलं होतं.


फ्रेंच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले तेव्हा त्यात 276 प्रवासी होते आणि दोन अल्पवयीन मुलांसह 25 जणांनी आश्रयासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी ते फ्रेंच भूमीवर होते. फ्रेंच मीडिया हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले आणि त्यांना साक्षीदार बनवून सोडण्यात आले. काही प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला असून इतर प्रवासी भारतात परतले आहेत.


लीजेंड एअरलाइन्सची प्रतिक्रिया काय?


रोमानियन एअरलाइन लीजेंड एअरलाइन्सच्या वकील लिलियाना बाकायोको यांनी सांगितलं की, विमान भाड्याने घेतलेली भागीदार कंपनी प्रत्येक प्रवाशाच्या ओळखीच्या कागदपत्रांची पडताळणी केली आहे आणि प्रवाशांच्या पासपोर्टची माहिती उड्डाणाच्या 48 तास आधी एअरलाइनला पाठवण्यात आली. फ्रान्समध्ये मानवी तस्करीसाठी 20 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.


काय प्रकरण आहे?


फ्रेंच अधिकाऱ्यांनी रविवारी, 24 डिसेंबरला रोमानियन कंपनी 'लेजेंड एअरलाइन्स' द्वारे संचालित A340 विमानाचा प्रवास पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. दुबई, संयुक्त अरब अमिराती येथून 303 प्रवाशांसह निकाराग्वाला जाणारं विमान शुक्रवारी, 22 डिसेंबरला पॅरिसपासून 150 किमी पूर्वेकडील विट्री विमानतळावर मानवी तस्करीच्या संशयावरून थांबवण्यात आलं होतं.