एक्स्प्लोर

मोदींनी 4 वर्षात 10 वेळा प्रोटोकॉल मोडला, मनमोहन सिंहांनी किती?

प्रोटोकॉल मोडण्याची मोदींची ही पहिलीच वेळ नाही. विविध देशांच्या प्रमुखांच्या स्वागतासाठी मोदींनी अनेकवेळा प्रोटोकॉल मोडले आहेत.

नवी दिल्ली: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नेतन्याहू नवी दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबईला भेट देणार आहेत. रविवारी भारतात आलेल्या नेतन्याहू यांचं स्वागत स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. प्रोटोकॉल तोडून मोदी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र प्रोटोकॉल मोडण्याची मोदींची ही पहिलीच वेळ नाही. विविध देशांच्या प्रमुखांच्या स्वागतासाठी मोदींनी अनेकवेळा प्रोटोकॉल मोडले आहेत. मोदींनी गेल्या चार वर्षात जवळपास दहावेळा प्रोटोकॉल मोडला आहे. याउलट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दहा वर्षांच्या कार्यकाळात केवळ तीन वेळाच प्रोटोकॉल तोडला होता. प्रोटोकॉलनुसार अन्य देशांच्या प्रमुखांचं स्वागत पंतप्रधान नव्हे तर परराष्ट्र मंत्र्यांनी करायचं असतं. पण मोदींनी त्याला फाटा देत स्वत:हून अनेकवेळा हजेरी लावली. मोदींनी कधी कधी प्रोटोकॉल मोडला? सप्टेंबर 2014 – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं अहमदाबादमध्ये स्वागत जानेवारी 2015 – अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांचं विमानतळावर जाऊन स्वागत डिसेंबर 2015 – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं वाराणसीत स्वागत जानेवारी 2016 – फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष ओलांद यांचं चंदीगढमध्ये स्वागत जानेवारी 2017 – अबूधाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांचं दिल्लीत स्वागत एप्रिल 2017 – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं दिल्ली विमानतळावर स्वागत जुलै 2017 – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादेत रोड शो 2017- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यासोबत दिल्ली मेट्रोतून प्रवास 2017- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका यांच्यासोबत हैदराबादेत डिनर जानेवारी 2018 – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू याचं दिल्ली विमानतळावर स्वागत यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही प्रोटोकॉल मोडला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जॉर्ज बुश यांच्या भारत दौऱ्यावेळी सिंह यांनी प्रोटोकॉल मोडून त्यांचं स्वागत केलं होतं. मनमोहन सिंहांनी मोडलेले प्रोटोकॉल मार्च 2006 मध्ये जॉर्ज बुश सपत्नीक भारत भेटीवर आले होते, त्यावेळी मनमोहन सिंह यांनी प्रोटोकॉल मोडला होता. याशिवाय 2006 मध्येच सौदी अरेबियाचे राजे अब्दुल बिन अब्दुल अझीज अल सौद हे भारतात आले होते, त्यावेळी मनमोहन सिंहांनी प्रोटोकॉल मोडला होता. त्यावेळी जवळपास 51 वर्षांनी सौदीच्या राजांनी भारताला भेट दिली होती. नोव्हेंबर 2010 मध्ये बराक ओबामा तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले होते. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह हे स्वत: त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget