एक्स्प्लोर

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार

2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपला मदत केली होती.

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आधी भाजप मग काँग्रेस अशी वाटचाल केलेले शंकर सिंह वाघेला आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहेत. "अहमदाबादमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत शंकरसिंह वाघेला पक्षात प्रवेश करतील," अशी माहिती गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल उर्फ बोस्की यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यावरच हा निर्णय घेतल्याचं वाघेला यांनी सांगितलं. तसंच मुंबईतून त्यांच्या औपचारिक पक्षप्रवेशाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. "मी या मुद्द्यावर पवार साहेबांशी चर्चा केली. ही चांगली गोष्ट असल्याचं मला वाटतंय. सार्वजनिक आयुष्यात जनतेच्या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी एका चांगल्या व्यासपीठाची गरज असते. कोणालाही अशा गोष्टींसाठी नाही म्हणता येणार नाही," असं शंकरसिंह वाघेला यांनी सांगितलं. काँग्रेसला सोडचिठ्ठी 2017 च्या विधानसभा निवडणुकीआधी शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर राज्यसभा निवडणुकीत वाघेला यांनी काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात भाजपला मदत केली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते आज अहमदाबादमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. राजकीय कारकीर्द शंकरसिंह वाघेला क्षत्रिय नेते आहेत. त्यांनी भाजपसोबत आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. पण 1995 साली गुजरातमध्ये भाजप सत्तेत आल्यावर त्यांच्याऐवजी केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या पक्षाच्या निर्णयानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला. काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेत 1996 मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले. मग ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसंच गुजरात विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
मुंबईत मॅनहोलमध्ये माणूस पडला, तात्काळ कारवाई, 4 जणांचे निलंबन; पीडित कुटुंबास 10 लाखांची मदत
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Embed widget