नागपूर : आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मागणीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुनरुच्चार केला आहे. मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी केलं आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी आरक्षण काढून टाकण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर बोलणं मात्र त्यांनी टाळलं आहे. परंतु मागासलेल्या समाजाचं आरक्षण कायम ठेवलं पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं.

देशातून सगळ्या प्रकारच्या आरक्षणाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्यांनी केलं आहे. ते जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलत होते. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमोहन वैद्यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपवर पुन्हा टीका केली जाते आहे.

संबंधित बातम्या : 'देशातून आरक्षण हद्दपार करा', RSSच्या मनमोहन वैद्यांचं वक्तव्य