नवी दिल्ली : नोटबंदीच्या काळात एकदाही बनावट नोटा सापडल्या नसल्याचा दावा करत नोटबंदीचा उद्देश सफल झाल्याचा दावा अर्थमंत्रालयानं केला आहे. लोकलेखा समितीच्या समोर सादर केलेल्या अहवालात अर्थमंत्रलायाने आश्चर्यजनक दावा केला आहे.
बनावट चलनाला आळा आणि दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या निधीला चाप लावणे हे नोटबंदीचे प्रमुख उद्देश होते. प्रत्यक्षात 437 कोटी 37 लाखांच्या नव्या आणि जुन्या नोटा आयकर विभागानं नोटबंदीच्या काळात जप्त केल्याचं उघड झालं आहे. मात्र, यापैकी किती पैसा दहशतवादी आणि गुन्हेगारी टोळ्यांकडून जप्त झाला हे सांगण्यास अर्थमंत्रालयानं असमर्थता दर्शवली आहे.
देशात जुन्या नोटांमध्ये सुमारे 400 कोटी बनावट नोटा होत्या, असा दावा सरकारनेच केला होता. त्यामुळे बनावट नोटा सापडला नसल्याचा दावा म्हणजे सरकारचं अपयश असल्याचं बोललं जात आहे.
नोटाबंदीच्या काळात मौल्यवान वस्तूंची जप्ती अधिक प्रमाणात झाली, तर बेहिशेबी संपत्ती जाहीर करण्याचं प्रमाणही वाढलं, असेही अर्थमंत्रालयाने लोकलेखा समितीच्या समोर सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. बेहिशेबी संपत्ती जाहीर करण्याचे प्रमाण 100 टक्क्यांनी वाढले असून, मौल्यवान वस्तू जप्तीचे प्रमाण 100 टक्क्यांनी वाढले आहे. त्याचसोबत, करवसुलीही वाढल्याचे अहवालात म्हटले आ