मुंबई : फोर्ड इंडिया कंपनीने आपल्या 'इको स्पोर्ट्स एसयुव्ही' मॉडेलच्या 48 हजार गाड्या परत मागवल्या आहेत. डिझेलवर चालणाऱ्या इको स्पोर्ट्स एसयुव्हीच्या सीट, ब्रेक आणि इंधन प्रणाली सदोष असल्याने हा निर्णय घेण्यात आला.


 
एप्रिल 2013 ते जून 2014 या कालावधीत ही मॉडेल्स बनवण्यात आली होती. याशिवाय जानेवारी 2016 ते फेब्रुवारी 2016 या कालावधीत तयार केलेल्या मॉडेल्सच्या 700 ग्राहकांशी संपर्क साधत आहे.

 
संबंधित वाहनांच्या पुढील सीटच्या बॅकरेस्टचे बोल्ट्स हे कंपनीच्या स्पेसिफिकेशन्सनुसार नसल्याने कार परत मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या तांत्रिक बिघाडामुळे अपघात किंवा दुखापत झाल्याची कोणतीही तक्रार ग्राहकांकडून आली नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

 
कंपनीने काही कारचालकांना संपर्क साधून जवळच्या डीलरकडून बिघाड दुरुस्त करुन घेण्याची विनंती केली आहे.
याच वर्षात फोर्ड इंडियाकडून कार परत मागवण्याची ही दुसरी वेळ आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात फिगो आणि अस्पायर मिनी सिडान एअरबॅग संबंधित दोषामुळे परत मागवल्या होत्या.