नवी दिल्ली: येत्या काही दिवसात मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे. याच मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. बदलांचे तसे संकेतही देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या ७ आरसीआर येथील निवासस्थानी यांसदर्भात बैठक झाली असल्याचे सूत्रांकडून समजतं आहे.


 

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने उत्तर प्रदेशमधील खासदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच याच दरम्यान पक्षसंघटनेतही बदल करण्यात येणार आहेत. पक्षसंघटना आणि मंत्रीमंडळातील बदल एकाच वेळी केले जावे अशी मोदींची इच्छा आहे. त्यामुळे आता जे मंत्री मंत्रिमंडळात आहेत त्यांना पक्षसंघटनेत पाठवलं जाऊ शकतं.

 

तसेच 11 आणि १२ जून रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक होणार. त्यापूर्वीच पक्षसंघटनेची घोषणा होणार आहे. तसेच कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात येईल.