Lalu Yadav Fodder Scam: राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांच्यासाठी आज महत्वाचा दिवस आहे. आज चारा घोटाळ्यातील (Fodder Scam) पाचव्या सर्वात मोठ्या प्रकरणी न्यायालय निकाल सुनावण्याची शक्यता आहे. जवळपास 950 कोटी रुपयांचा हा घोटाळा लालूंसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. आज याशीच संबधित असलेल्या दोरांडा (Doranda) कोषागार प्रकरणी रांचीतील विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात ही लालू प्रवाद यादव हे दोषी आढळ्यास त्यांना पुन्हा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणी आज सकाळी 11 वाजता निकाल येणार असून या खटल्यासाठी लालू रांचीला पोहोचले आहेत, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी मीसाही आहे.
चारा घोटाळा प्रकरणी लालू यांच्यासह इतर आरोपींनाही झाली होती शिक्षा
चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव आणि इतरांना यापूर्वीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाचही खटल्यांमध्ये एकच साक्षीदार आणि कागदपत्रे असून, त्या आधारे चार प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे पैसे काढल्याच्या प्रकरणात त्याच साक्षीदार आणि कागदपत्रांच्या आधारे न्यायालय निकाल सुनावू शकते.
काय आहे दोरंडा प्रकरण?
1990 ते 1995 साला दरम्यान दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोळयातील सर्वात मोठे प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. याप्रकरणातील एकूण 99 आरोपींवर अद्यापही निर्णय येणे बाकी आहे.
दरम्यान, चारा घोटाळ्यातील चार प्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. या खटल्यासाठी रांचीला पोहोचलेल्या लालूंनी येथील आपल्या कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. याप्रकरणातील निकालावर बिहारसह देशभरात अनेकांचं लक्ष लागून राहील आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी, तीन सदस्यीय खंडपीठ करणार सुनावणी
- Health Tips : मशरूमचे 'हे' आश्चर्यकारक फायदे ठाऊक आहेत का?
- Viral Video : विमानात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये खळबळ, व्हिडिओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha