एक्स्प्लोर

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात, अर्थमंत्र्यांची घोषणा; शेअर बाजारात उत्साह

कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा अध्यादेश मंजूर झाल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. गोव्यात आज जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारमण यांनी ही माहिती दिली.

पणजी (गोवा) : देशाला मंदीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने आज (20 सप्टेंबर) पुन्हा निर्णय घेतले आहेत. देशांतर्गत कंपन्या आणि नव्या देशांतर्गत उत्पादन कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा अध्यादेश मंजूर झाल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. गोव्यात आज जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री सीतारमण यांनी ही माहिती दिली. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याची घोषणा विकास आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी आयकर कायद्यातील बदल सध्याच्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 2019-20 पासून लागू होईल. देशांतर्गत कंपन्यांना सूटशिवाय 22 टक्के आयकर द्यावा लागेल. तसंच सरचार्ज आणि सेस जोडून हा दर 25.17 टक्के होईल. आधी हा दर 30 टक्के होता. अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात आणि इतर सवलतींमुळे सरकारी तिजोरीवर 1.45 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्सही हटवला याशिवाय MAT म्हणजेच मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हटवला आहे. यामुळे इन्सेन्टिव्ह आणि सूट मिळवणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. MAT चा दर 18.5 टक्क्यांवरुन कमी करुन 15 टक्के केला आहे. आयकर कायद्याच्या कलम 115JB अंतर्गत  MAT आकारला जातो. शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांसाठी खास काय? कंपन्यांसाठी आणखी मोठी घोषणा करताना अर्थमंत्र म्हणाल्या की, 5 जुलै 2019 च्या आधी शेअरच्या बायबॅकची घोषणा करणाऱ्या कंपन्यांवर सुपर रिच टॅक्स लागणार नाही. शेअर बाजारात उत्साह निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. सेन्सेक्सने 1600 अंकांनी उसळी घेतली. तर निफ्टीही 250 अंकांनी वधारला. सेन्सेक्‍स 37 हजारांच्या पार गेला तर निफ्टीनेही 11 हजारांच्या स्तराला स्पर्श केला. याशिवाय रुपयाही 60 पैशांनी मजबूत झाला आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 70.68 वर पोहोचली. मेक इन इंडियाला मजबुती मेक इन इंडियाला मजबुती देण्यासाठी सीतारमण यांनी आयकर कायद्यात आणखी एक कलम जोडण्यात आलं आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1 ऑक्टोबरनंतर स्थापन झालेल्या देशांतर्गत कंपन्या ज्या उत्पादनात गुंतवणूक करतील, त्यांच्याकडे 15 टक्क्यांच्या दराने आयकर देण्याचा पर्याय असेल. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2019 रोजी किंवा त्यानंतर भारतात स्थापन झालेल्या कोणत्याही कंपनीवर 15 टक्के टॅक्स आकारला जाईल. जर कंपनीने 31 मार्च 2023 च्या आधीपासूनच उत्पादन सुरु केलं तर त्यावर 15 टक्के टॅक्स लागेल. सर्व प्रकारचे सरचार्ज आणि सेससह 17.10 टक्के कर असेल.

महत्त्वाच्या बातम्या

पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Embed widget