नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळं देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण 20 लाख कोटीच्या पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करणार आहेत. आज सायंकाळी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करणार आहेत. या पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना समाजातील शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला होता.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल आपल्या दुसर्‍या पत्रकार परिषदेत स्थलांतरित कामगार, पथ विक्रेते, छोटे व्यापारी आणि छोटे शेतकरी याबद्दल घोषणा केली होती. 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात येणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांना पुढील दोन महिने मोफत धान्य मिळणार असून. कार्ड नसलेल्यांना पाच किलो रेशन देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली होती.

रेशन कार्ड नसणाऱ्यांना 5 किलो धान्य मिळणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, कामगारांचे कल्याण हे आमच्या अजेंड्यात अव्वल आहे. किमान वेतन सध्या केवळ 30 टक्के कामगारांना लागू आहे. आम्हाला ते प्रत्येकासाठी बनवायचे आहे. तसेच 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात आली आहे. 25 लाख नवीन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी आजच दोनच घोषणा असल्या तरीही पुढेही त्यांच्यासाठी घोषणा असणार आहेत.

12 हजार बचतगटांकडून 3 कोटी मास्क आणि दीड लाख लीटर पर्यंत सॅनिटायझरची निर्मिती केली आहे, असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं होतं. गेल्या दोन महिन्यात 7 हजार 200 बचतगटांची स्थापना झाली आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सूक्ष्म व लघु उद्योगांना गँरंटीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार : अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानंतर 13 मे रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत या योजनेचा कुणाला कसा फायदा मिळणार याची सविस्तर माहिती दिली होती. ऑगस्ट महिन्यापर्यंत कंपनी आणि कर्मचार्‍यांचा 12 टक्के + 12 टक्के पीएफमध्ये केंद्र सरकार जमा करणार आहे. याचा 75 लाखाहून अधिक कर्मचारी व कंपन्यांना फायदा होणार आहे. सरकारने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातही यामध्ये हातभार लावला होता. हीच सुविधा आता तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा; कर्मचाऱ्यांना, उद्योग क्षेत्राला दिलासा

कोरोनाच्या संकटात कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. पुढील तीन महिन्यांसाठी खासगी कंपन्याना 12 टक्क्यांएवजी 10 टक्के पीएळ भरावा लागणार आहे. ऑगस्टपर्यंत सरकार हे पीएफ भरणार आहे. ज्या कंपन्यांकडे 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, तसेच 90 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना सरकारच्या या योजनेचा फायदा होणार आहे. म्हणजेच 15 हजाराहून अधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. यामध्ये जवळपास 3,67,000  कंपन्यांना आणि 72,22,000 कर्मचार्‍यांना याचा फायदा होईल. यावर सरकार 2500 कोटी खर्च करणार आहे.

तसेच वीज वितरण कंपन्यांना मदत करण्यासाठी 90,000 कोटी रुपये दिले जाणार आहेत. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी, मायक्रो फायनान्स कंपन्यांसाठी 30,000 कोटींची योजना आणली जात आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांसाठी 45,000 कोटी रुपयांच्या आधीच सुरू असलेल्या योजनांचा विस्तार होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं होतं.


FM Nirmala Sitharaman | सूक्ष्म आणि लघु उद्योगांना गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्जाचं पॅकेज :अर्थमंत्री निर्मला सीतारामण