नवी दिल्ली : समाजातील अनेक घटकांशी संवाद साधून हे आर्थिक पॅकेज तयार करण्यात आले आहे. या पॅकेजद्वारे देशातील विकास वाढवण्याची योजना आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत योजना म्हटले असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. कोरोना व्हायरसच्या या संकटाला संधी म्हणून पाहायचे आहे. आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात गरिबांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये लघु व कुटीर उद्योगांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • कोविड19 मुळे मोदी सरकारनेपंतप्रधानांना गरीब कल्याण योजना आणली आहे

  • देशातील गरिबांना उपाशी राहण्याची गरज नाही. गरिबांसाठी 1,70,000 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 20 लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक पॅकेजची घोषणा केली. दररोज वेगवेगळ्या क्षेत्राच्या आधारे आम्ही आपल्याला त्या लोकांच्या पॅकेजबद्दल माहिती देऊ असे त्यांनी आम्हाला निर्देश दि : सीतारामण

  • लघु आणि कुटीर उद्योगांसाठी सहा मोठ्या योजना.

  • लघु आणि कुटीर उद्योगांसाठी कोणत्याही गँरंटीशिवाय 3 लाख रुपयांचं कर्ज देण्यात येणार

  • 45 लाख लघु उद्योगांना 31 ऑक्टबरपासून याचा फायदा मिळणार

  • या कठीण काळात गरिबांच्या काळात थेट मदत पोहचवली जात आहे.


मोदींचा स्वदेशीचा नारा भारतीय उद्योगांसाठी फायदेशीर | Shriram Dandekar Camlin | माझा गेस्ट