नवी दिल्ली : देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, असं विधान देशाचे मावळते उपराष्ट्रपदी हमीद अन्सारी यांनी केलं आहे. राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अन्सारी यांनी वक्तव्य केल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यकाळ संपत असताना हमीद अन्सारी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हमीद अन्सारी यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत अशी टिप्पणी केली आहे, ज्यामुळे त्यांनी मोदी सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
"देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे, असं अन्सारी म्हणाले.
पीटीआयनुसार, उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेकी, अंधश्रद्धेचा विरोध करणाऱ्यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना, संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची क्षमताही वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे.
देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या इतर मंत्र्यांसमोरही मांडल्याचं हमीद अन्सारी यांनी मुलाखतीत सांगितलं.
देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना : अन्सारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2017 08:18 AM (IST)
देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -