लखनऊ : क्रांतिदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. या सत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता, टीका केली. त्यावर संघानेही प्रत्युत्तर दिलं आहे. सोनिया गांधींनी आधी इतिहास वाचावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिला आहे.
मनमोहन वैद्य सध्या उत्तर प्रदेशमधील गोरखपुरमध्ये आहेत. शिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तीन दिवसांच्या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. सोनिया गांधींच्या टीकेनंतर मनमोहन वैद्य यांनी एबीपी न्यूजशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सोनिया गांधींवर जोरदार हल्ला चढवला.
सोनिया गांधींच्या टीकेला उत्तर देताना मनमोहन वैद्य म्हणाले की, ''काँग्रेसवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे पक्षाची आज दयनीय अवस्था आहे. तर दुसरीकडे संघाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.''
देशाला स्वातंत्र्य एका कुटुंबामुळे मिळालं नसल्याचं सांगून वैद्य पुढे म्हणाले की, ''संघ संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वत: असहकार आंदोलनात सहभागी होऊन, तुरुंगवास भोगला. याशिवाय हजारो स्वयंसेवकांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. 1934 मध्ये स्वत: महात्मा गांधींनी वर्ध्यातील संघाच्या शिबीराला भेट दिली होती.''
''देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता. त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या ‘चले जाव’ चळवळीलाही विरोध केला होता,” अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला होता.
संबंधित बातम्या
देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नसणाऱ्यांचं राज्य : सोनिया गांधी
सोनिया गांधींनी इतिहास वाचावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2017 12:00 AM (IST)
क्रांतिदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त लोकसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. या सत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव न घेता, टीका केली. त्यावर संघानेही प्रत्युत्तर दिलं आहे. सोनिया गांधींनी आधी इतिहास वाचावा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -